पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

झाडाला पाणी घालत असताना पाचव्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला.

झाडाला पाणी घालत असताना पाचव्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला. नेपियन्सी रोड येथील रिझव्र्ह बँकेच्या कर्मचारी वसाहतीमधील वसंत विहार या इमारतीत शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. विजया सिस्टला (५५) या महिला या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहात होत्या. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या खिडकीतील झाडांना पाणी घालत होत्या. मात्र अचानक त्यांचा तोल गेला. खिडकीला संरक्षक जाळी नसल्याने त्या खाली पडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मलबार हिल पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman lying fifth floor