मुंब्य्रात महिलेची निर्घृण हत्या

मुंब्रा येथील बाह्य़वळण मार्गावरील गीता कंपाऊंड परिसरात सोमवारी एका प्लॅस्टिकच्या गोणीत महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले होते.

मुंब्रा येथील बाह्य़वळण मार्गावरील गीता कंपाऊंड परिसरात सोमवारी एका प्लॅस्टिकच्या गोणीत महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले होते.
मृत महिला ३० ते ३५ वयोगटातील असून तिची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. गळा आणि कंबरेपासूनचा खालचा भाग तीक्ष्ण हत्याराने कापण्यात आला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नसून त्याचा पोलीस शोध घेत आहेत, तसेच तिच्या हत्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman remorseless murder in mumbra

ताज्या बातम्या