Woman who threw her newborn baby from building gets bail after three years mumbai | Loksatta

मुंबई: नवजात बालकाला इमारतीवरून फेकणाऱ्या महिलेला तीन वर्षांनी जामीन

पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा रागातून महिलेने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला इमारतीवरून खाली फेकल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

मुंबई: नवजात बालकाला इमारतीवरून फेकणाऱ्या महिलेला तीन वर्षांनी जामीन
प्रातिनिधिक छायाचित्र

आपल्याच नवजात बाळाला इमारतीवरून फेकल्याचा आरोप असलेल्या कांदिवलीस्थित महिलेला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. याचिकाकर्तीवर भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांनुसार, १२ वर्षांखालील मुलाला सोडून देणे, त्याची हत्या करणे आणि पुरावा नष्ट करण्याच्या आरोपांतर्गत कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा- रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त मेगाब्लाॅक नाही

याचिकाकर्ती जवळपास तीन वर्षांपासून कोठडीत असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यामुळे तिला कोठडीत आणखी ठेवण्याने कोणताही हेतू साध्य होणार नाही. नजीकच्या काळात तिच्याविरोधातील खटला सुरू होण्याची शक्यताही धूसर आहे, असे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने या महिलेला जामीन मंजूर करताना नमूद केले. तसेच तिची दहा रुपयांच्या वैयक्तिक बंधपत्रावर जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.

हेही वााच- ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार

याचिकाकर्तीवर आपल्या बाळाला इमारतीवरून फेकून दिल्याचा मुख्य आरोप आहे. पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा याचिकाकर्तीला संशय होता आणि त्यामुळेच ती त्याच्यावर नाराज होती. याचदरम्यान म्हणजेच घटनेच्या दिवशी तिने बाळाला जन्म दिला. तसेच पतीवरील रागाच्या पार्श्वभूमीवर बाळाला जन्म दिल्यावर स्वत: चाकूने त्याची नाळ कापली. त्यानंतर तिने बाळाला इमारतीवरून फेकून दिले, असा पोलिसांचा आरोप आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 21:46 IST
Next Story
रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त मेगाब्लाॅक नाही