..त्याने पत्नीची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला

मीरा रोड येथे राहणाऱ्या गिरीश कोटे याने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली.

मीरा रोड येथे राहणा-या गिरीश कोटे याने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. मीरा रोडच्या गोल्डन नेक्स्ट परिसरात नक्षत्र टॉवरच्या १४व्या मजल्यावर हे जोडपे गेल्या सहा महिन्यांपासून भाडय़ाने राहात होते. कोटे याने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये व बेडरूममध्ये ठेवले होते.

फोटो गॅलरी : पत्नीची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला

आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर गिरीश कोटे या युवकाने पत्नीच्या शरीराच्या वरच्या भागाचे तीन तुकडे करून प्लास्टिक पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवले आणि कमरेखालचे काही भाग कपड्यात आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळून बेडरूमधील पलंगावरच ठेवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीश हा व्यसनाधिन आहे आणि आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने हे कृत्य केले आहे.    
हत्या केल्यानंतर तो एक एक भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देणार होता, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. गिरीश आणि त्याची पत्नी सहा महिन्यापूर्वीच या इमारतीत भाड्याने रहायला आले होते. या दाम्पत्याला एक तीन वर्षांचा मुलगाही आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी गिरीशला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Womans body parts kept in fridge husband arrested in meera road