scorecardresearch

शिवडी रुग्णालयातील कामगारांचे आज ठिय्या आंदोलन

कामगारांच्या व परिचारिकांच्या विविध मागण्या अद्याप मान्य न झाल्यामुळे शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील  म्युनिसिपल मजदूर युनियनने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिवडी रुग्णालयातील कामगारांचे आज ठिय्या आंदोलन
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कामगारांच्या व परिचारिकांच्या विविध मागण्या अद्याप मान्य न झाल्यामुळे शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील  म्युनिसिपल मजदूर युनियनने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्या, सोमवारपासून हे आंदोलन सुरू होईल, असा इशारा देण्यात आला.

के. ई. एम, नायर, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय या महापालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयांतील परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांना महिन्याला आठ साप्ताहिक सुट्टी दिल्या जातात. याच धर्तीवर महापालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील परिचारिकांनाही साप्ताहिक सुट्टय़ा दिल्या जाव्यात, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.

हमालाची पदे भरणे, कालबध्द पदोन्नती देण्यास प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Workers nurses of shivdi hospital strike today ysh

ताज्या बातम्या