गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  मुंबईत ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातले पहिले संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. मंगेशकर कुटुंबीयांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारकडून लतादीदींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून हा निर्णय घेतला आहे.  या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील कलाकार येत्या काळात तयार होतील, असे ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World class music college in mumbai soon abn
First published on: 29-09-2020 at 00:16 IST