मुंबई : वरळीमधील गांधी नगर येथील भारत बाजार परिसरातील मार्शल शोरूमच्या गोदामात शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला.वरळी येथील गोदामाला आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सकाळी ५ वाजता अग्निशमन दलाने ही आग क्रमांक १ ची असल्याचे जाहीर केले.

या आगीत विद्युत वाहिन्या, विद्युत यंत्रणा, कागदांचे गठ्ठे, गिफ्ट बॉक्सेस, मेकअप साहित्य, स्टेशनरी, कपडे, संगणक, लाकडी दरवाजे आणि इतर साठवलेले साहित्य भस्मसात झाले. सुमारे ९०० चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या आगीमुळे मोठे नुकसान झाले. सकाळी ७.१२ वाजता आग पूर्णतः विझवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवान जखमी

या आगीत अग्निशमन दलातील जवान अजिंद्र गणपत सावंत जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्यांना तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.