लेखक-दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन

कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आजवर ८०० जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. 

मुंबई : प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक राज कौशल यांचे बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. राज यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

राज यांनी जाहिरात क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू के ली होती. लेखक-दिग्दर्शक-निर्माता म्हणून नावारूपाला आलेल्या राज यांनी ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन के ले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी मुकु ल आनंद, सुभाष घई यांच्याकडे साहाय्यक म्हणूनही काम के ले होते. त्यांनी १९९८ साली स्वत:ची जाहिरात कं पनी सुरू के ली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आजवर ८०० जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे.  अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्याशी १९९९ साली राज विवाहबद्ध झाले. त्यांना एक मुलगा असून गेल्या वर्षी या दाम्पत्याने एक मुलगी दत्तक घेतली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Writer director raj kaushal passes away akp