Mumbai Blast Terrorist Yakub Memon Grave Renovation : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभिकरण केल्याचा वाद सध्या सुरू झाला आहे. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे भाजपाकडून यासंदर्भात शिवसेनेवर आरोप केले जात असताना शिवसेनेकडून २०१५मध्येच भाजपा सरकारच्या काळात ती कबर का बांधली गेली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना आता मेमनची कबर असलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षांनीच यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सुशोभिकरणाचा दावा फेटाळून लावला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

भाजपा नेते राम कदम यांनी याकूब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करन त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. याकूब मेमनच्या कबरीचं उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने सुशोभिकरण झालं का? असा सवाल राम कदम यांनी ट्वीटमध्ये उपस्थित केला होता. त्यावरून वाद निर्माण झाला. यानंतर कबरीवर लावलेले लाईट्स काढण्यात आले. त्यासंदर्भात भाजपाने केलेल्या आरोपांना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

आदित्य ठाकरेंचा प्रतिप्रश्न

आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात बोलताना भाजपालाच प्रतिप्रश्न केले आहेत. “पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसाचं दफन का झालं? आपण त्याला अतिरेकी म्हणून फाशी दिली. ओसामा बिन लादेनचं समुद्रात दफन झालं. मग याचं एवढं मोठं दफन यांनी का केलं? शिवाय दफन करताना एनओसी घेणं गरजेचं आहे. ती एनओसी कुठेही नाही. महत्त्वाचं म्हणजे ही ट्रस्ट खासगी आहे, महापालिकेचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही”, असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं. “हे सगळं होत असताना २०१५ मध्ये एवढा मानसन्मान एका अतिरेक्याला दिला का?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

सुशोभिकरणाचं वृत्त चुकीचं?

दरम्यान, या सर्व वादावर ट्रस्टचे ट्रस्टी शोएब खातिब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “या बातमीत कोणतंही तथ्य नाही की याकूब मेमनच्या कबरीसाठी मार्बल, लाईट वगैरे लावण्यात आले. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मोठ्या कब्रिस्तानांमध्ये अनेक कबरींवर अशा प्रकारे मार्बल लावलं जातं”, असं ते म्हणाले.

याकूब मेमन कबर सुशोभिकरणावरून आदित्य ठाकरेंचा भाजपालाच प्रतिप्रश्न; म्हणाले, “तेव्हाच एका अतिरेक्याला…!”

व्हायरल व्हिडीओ जुना?

“लाईट लावलेला जो व्हिडीओ आपण पाहात आहात, तो ‘बडी रात’च्या वेळेचा आहे. शब-ए-बारातच्या वेळी गेल्या तीन वर्षांत कोविडमुळे हे काहीच होऊ शकलं नाही. त्यामुळे यावेळी मुंबईतल्या मोठ्या कब्रिस्तानातच नाही, तर सर्वच कब्रिस्तानांमध्ये हे केलं गेलं आहे”, असं स्पष्टीकरण खातिब यांनी दिलं.

“याकूब मेमनविषयी आम्हाला कोणत्याही सद्भावना नाहीत. त्याने देशाचं फार मोठं नुकसान केलं होतं. आम्ही त्याच्या कबरीसाठी या सगळ्या सुविधा का देऊ? याकूब मेमनच्या कबरीव्यतिरिक्त तिथे इतर १७ कबरीदेखील आहेत. तुम्ही जाऊन पाहा. तिथे काळ्या रंगाचं मार्बल होतं. ५-७ वर्षांपूर्वी तिथे नुकसान झालं होतं. कबरीतली माती बाहेर येत होती. त्यामुळे त्यांच्या काही दूरच्या नातेवाईकांनी अर्ज दाखल केला आणि तिथे दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली”, असा दावा खातिब यांनी केला आहे.

दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई

कबरीच्या बाजूला लाईट का लावले?

दरम्यान, याकूब मेमनच्या कबरीवर लाईट का लावण्यात आले? असा प्रश्न विचारला असता खातिब यांनी त्यावरही स्पष्टीकरण दिलं आहे. “रात्रीच्या वेळी जेव्हा प्रेतयात्रा येते, तेव्हा त्या भागात मृताचे नातेवाईक गोळा होतात. तिथे अंधार असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या भागात लाईट लावण्यात आले होते. याकूब मेमनच्या कबरीसाठी नाही. पण त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आम्ही त्या लाईट काढून टाकल्या”, असं खातिब म्हणाले.