मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरकडून देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य, शेती-पाणी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव हा पुरस्कार देऊन केला जातो.

शेती-पाणी क्षेत्रासाठीचा पुरस्कार गोंदियातील शीला रामकृष्ण खुणे आणि यवतमाळमधील वर्षा नरेंद्र हाडके यांना जाहीर झाला आहे.

हे ही वाचा…मुंबई : योजना टाळण्यासाठी भूखंडाचे तुकडे,२० टक्के सर्वसमावेश योजनेत नाशिकमधील विकासकांची शक्कल; म्हाडाकडून दखल

खणे यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करत कलिंगडाचे किफायतशीर पीक घेतले आहे. तर हाडके यांनी पतीच्या निधनानंतर निर्धाराने शेती करत सोयाबिनचे भरघोष पीक घेतले आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव पुरस्काराने करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रातील कवितेसाठीचा पुरस्कार छ. संभाजीनगरच्या गणेश घुले, सोलापूरच्या महेश लोंढे व जळगावच्या नामदेव कोळी यांना जाहीर झाला. कादंबरीसाठीचा पुरस्कार मुंबईतील प्रदीप कोकरे यांनी जाहीर झाला आहे.

हे ही वाचा…Central Railway : आता फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात; मध्य रेल्वेनं घेतला ‘हा’ निर्णय!

१९ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी परिवर्तन, जळगाव आयोजित ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’हा अभंग गायनाचा कार्यक्रम होणार आहे.