विवाहितेची हत्या

जेवणात मीठ कमी पडल्याने पत्नीची रस्त्यात हत्या

संग्रहित छायाचित्र

जेवणात मीठ कमी पडल्याने तरुणाने पत्नीची रस्त्यात हत्या केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री भेंडीबाजार परिसरात, मोहम्मद अली मार्गावर घडला.

अब्दुल रेहमान शेख असे आरोपीचे नाव असून तो पत्नी नुसरतबरोबर भेंडीबाजार परिसरात वास्तव्यास होता. मिठावरून अब्दुलने वाद घातला आणि नुसरतला मारहाण सुरू केली. तावडीतून निसटलेल्या नुसरतचा अब्दुलने पाठलाग केला. पुन्हा पकडून अब्दुलने तिचे कपाळ रस्त्यावरील उंच दुभाजकावर आपटले. त्यात नुसरतचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Young man kills wife on street due to lack of salt in meal abn

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या