डोंबिवलीत महाविद्यालयाबाहेर तरुणाची हत्या

प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा अंदाज

छायाचित्र प्रातिनिधिक

डोंबिवलीत महाविद्यालयाबाहेर दिवसाढवळ्या २० वर्षीय तरुणाची दोन तरुणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रणव मोरे असे या तरुणाचे नाव असून हत्या करणा-या आरोपींची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डोंबिवली पश्चिमेत राहणारा प्रणव मोरे हा तरुण वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत होता. मंगळवारी दुपारी डोंबिवली पूर्वेतील साऊथ इंडियन कॉलेजच्या बाहेर दोन तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. तीक्ष्ण हत्यांरांनी त्याच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात प्रणवचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींची ओळख पटली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस कायद्याचा धाक निर्माण करण्यास अपयशी ठरत असल्याची खंत शहरातील नागरिक व्यक्त करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Youth killed in dombivli near sia collegeattacker fled

ताज्या बातम्या