जुगाराच्या वादातून वाकोल्यात तरुणाची हत्या

जुगार खेळताना झालेल्या वादातून एका २० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. वाकोला येथील योगिराज आश्रम परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली.

जुगार खेळताना झालेल्या वादातून एका २० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. वाकोला येथील योगिराज आश्रम परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली.
या परिसरात राहणारे राजेश सिंग आणि बबन सिंग हे शनिवारी दुपारी जुगार खेळत होते. त्या वेळी पैशांच्या वादातून त्यांच्या शाब्दीक चकमक उडाली. भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. बबनने राजेशला मारहाण केली. जखमी राजेश सिंगला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बबनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Youth killed in vakola out of clash in gambling

ताज्या बातम्या