खिडकीत बसून सिगरेट ओढणे एका तरुणाच्या जिवावर बेतले. मीरा रोड येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत राहुल मेहता या ३० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. नवघर पोलीस या प्रकरणी अधिक तपास
करत आहेत.
मीरा रोड येथील आयडियल पार्क संकुलातील ‘गार्डन सिटी’ या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील खिडकीत बसून राहुल सिगरेट ओढत होता. खिडकीला ग्रील नसल्याने सिगरेट ओढण्याच्या नादात तो तोल जाऊन खाली पडला.
सायंकाळी सात वाजता ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.