खिडकीत बसून सिगरेट ओढणे एका तरुणाच्या जिवावर बेतले. मीरा रोड येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत राहुल मेहता या ३० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. नवघर पोलीस या प्रकरणी अधिक तपास
करत आहेत.
मीरा रोड येथील आयडियल पार्क संकुलातील ‘गार्डन सिटी’ या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील खिडकीत बसून राहुल सिगरेट ओढत होता. खिडकीला ग्रील नसल्याने सिगरेट ओढण्याच्या नादात तो तोल जाऊन खाली पडला.
सायंकाळी सात वाजता ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
खिडकीत बसून सिगरेट ओढणे तरुणाच्या जिवावर बेतले
खिडकीत बसून सिगरेट ओढणे एका तरुणाच्या जिवावर बेतले. मीरा रोड येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत राहुल मेहता या ३० वर्षांच्या तरुणाचा
First published on: 19-01-2014 at 03:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth killed smoking cigaret in window