scorecardresearch

Premium

विक्रोळीत मिरवणुकीत सहभागी तरूणांनी केला महिला पोलिसांचा विनयभंग

विक्रोळीमध्ये शुक्रवारी एका समाजाची धार्मिक मिरवणूक सुरू असताना त्यात सहभागी काही तरुणांनी एका महिला पोलिसाचा पाठलाग करून तिची छेड काढल्याचे उघडकीस आले आहे.

women policemen got molested in procession
पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विक्रोळीमध्ये शुक्रवारी एका समाजाची धार्मिक मिरवणूक सुरू असताना त्यात सहभागी काही तरुणांनी एका महिला पोलिसाचा पाठलाग करून तिची छेड काढल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी पार्कसाईट पोलीस ठण्याबाहेर आंदोलन केले. तसेच आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Beaten
विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी; २० जणांविरुद्ध गुन्हा
clash between two group workers during Ganesh immersion procession in mulund
मुलुंडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी,एकजण गंभीर
murder of truck driver in Kalyan
कल्याणमधील ट्रक चालकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
kdmc commissioner order to fill potholes in dombivli kalyan
रात्रंदिवस काम करुन डोंबिवली-कल्याणमधील खड्डे तीन दिवसात भरा; आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

एका समाजातर्फे शुक्रवारी विक्रोळी परिसरात धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास विक्रोळी पार्कसाईट येथून जात होती. त्याच वेळी कामावरून सुटलेल्या एक महिला पोलीस शिपाई या परिसरातील त्यांच्या नातेवाईकांकडे जात होत्या. मिरवणुकीतील काही तरुणांनी या महिला पोलीस शिपायाची छेड काढली. आरोपींनी काही अंतरापर्यंत या तरुणीचा पाठलागही केला. मात्र पीडित तरुणीने पळ काढून पार्कसाईट पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार येथील पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

आणखी वाचा-मुंबई: मध्य रेल्वेवर मालगाडी रुळावरून घसरली

मात्र शनिवारी सकाळी या घटनेची माहिती सर्वदूर पसरली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पार्कसाईट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करून त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. परिसरातील सीसी टीव्ही चित्रण आणि मिरवणुकीत सहभागी नागरिकांच्या माहितीवरून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youths participating in the procession molested the women policemen mumbai print news mrj

First published on: 30-09-2023 at 16:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×