मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईच्या घरभाडे व्यवस्थापन प्रणालीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. या प्रणालीस दिल्ली येथे एका समारंभात ‘स्काॅच सुवर्ण गौरव’ या प्रतिष्ठीत पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना अनेक विकासक झोपडीधारकांचे घरभाडे थकवित असून घरभाडे देणेही बंद करत आहेत. त्यामुळे झोपडीधारकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरभाड्यासंबंधित अनेक तक्रारी झोपु प्राधिकरणाला प्राप्त झाल्या होत्या, तर घरभाड्यापोटीची कोट्यवधींची थकबाकी विकासकांकडे होती. या सर्व पार्श्वभूमीवर घरभाड्याचा प्रश्न निकाली काढत झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी झोपु प्राधिकरणाने घरभाडे वसूली करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली. तर नवीन प्रकल्पासाठी तीन वर्षांचे घरभाडे झोपडीधारकांना देणे विकासकांसाठी बंधनकारक केले. तसेच घरभाडे वसूलीसाठी, घरभाड्यासाठीच्या तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी घरभाडे व्यवस्थापन प्रणाली प्राधिकरणाने कार्यान्वित केली. या प्रणालीनंतर तक्रारींचे निवारण करत मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे.

हेही वाचा : मेट्रो ४ : कापूरबावडी येथे चार तुळई बसविण्यात एमएमआरडीएला यश, प्रत्येकी १०० टनाच्या तुळई आठ तासांत बसविल्या

Maharera builders Crore outstanding Homebuyer Thane, Raigad, Palghar
जिल्हा प्रशासन ढिम्म .. महारेरा हतबल ! ठाणे, रायगड, पालघर मधील घरखरेदीदारांचे २०२.७८ कोटींचा परतावा थकीत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
Samajwadi Party opposed BMC budget property tax
व्यावसायिक झोपड्यावर मालमत्ता कर आकारण्यास समाजवादी पक्षाचा विरोध, घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्कालाही विरोध
Flats in Bhandup Mulund Juhu and Malad for project affected people mumbai print news
मुंबई: प्रकल्पबाधितांसाठी भांडुप, मुलुंड, जुहू आणि मालाडमध्ये सदनिका
scheme, Tax, Nagar Parishad, Nagar Panchayat,
थकीत कर! राज्यात नगरपरिषद, नगर पंचायतीमध्ये राबविणार ‘ही’ योजना…
GBS , Pune, Pune Municipal Corporation,
पुणे : शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतले मोठे निर्णय!
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय

घरभाडे व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर तक्रारींची संख्या ६५ टक्के इतकी कमी झाली आहे. तर सुमारे ३०० कोटींची थकबाकी वसूल करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे. दर महिन्याला आता ७५ कोटींच्या भाड्यांचे वाटप करण्यात येते. एकूणच ही प्रणाली झोपडीधारकांसाठी अत्यंत फायद्याची ठरत आहे. अशा या प्रणालीची दखल घेत या प्रणालीस ‘स्काॅच सुवर्ण गौरव’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Story img Loader