आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून ६ जिल्ह्य़ांत वितरण;  उद्यापासून लसीकरण, आरोग्य विभाग सज्ज

नागपूर : आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यासाठी पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्य़ांसाठीचे १ लाख १४ हजार लसींचे डोस बुधवारी मध्यरात्री २.४५ वाजता नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यायात दाखल झालेत. या लसींचे उपसंचालक कार्यालयाकडून पहाटे ४.१५ वाजेपर्यंत तातडीने सहा जिल्ह्य़ांत वितरणही केले गेले.

करोना प्रतिबंधक लस मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांत नोंदणी केलेल्या ९३ हजार ३०९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. यात डॉक्टरांपासून चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या संवर्गातील कर्मचारी आहे. ते येथील शासकीय व खासगी रुग्णालयांत कार्यरत आहेत. विभागातील ३४ केंद्रांवरून कोविशिल्डची लस दिली जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी सांगितले. ही लस उपसंचालक कार्यालयातून विशेष शीतकक्ष (व्यवस्था) असलेल्या वाहनाने सहा जिल्ह्य़ांत पहाटे ४.१५ वाजतापर्यंत पाठवण्यात आली. १६ जानेवारीपासून ही लस विभागातील ३४ केंद्रांवर दिली जाणार आहे.

आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहिमेसाठी विशेष पथक तयार केले असून लसीकरणासाठी सर्व जिल्’ांमध्ये प्रात्यक्षिकही झाले आहेत. प्रत्येक केंद्रावर दररोज सरासरी शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण होईल. सिरम इन्स्टिटय़ूटमधून ही लस नागपुरात पोहचल्यावर भंडारा जिल्’ासाठी ९ हजार ५००, चंद्रपूर २० हजार, गडचिरोली १२ हजार, गोंदिया १० हजार, नागपूर ४२ हजार तर वर्धा जिल्’ासाठी २० हजार ५०० कोविशिल्ड डोजेसचा पुरवठा करण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्य़ात १२ केंद्र असून त्यात शहरातील पाच तर ग्रामीण भागातील सात केंद्रांचा समावेश आहे. शहरातील पाच केंद्रांमध्ये डागा माहिला रुग्णालय, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यलय व महाल येथील डायग्नोसिस सेंटर या केंद्रांचा समावेश असल्याचे डॉ. जयस्वाल यांनी सांगितले.

९३ हजार ३०९ आरोग्य सेवकांची नोंदणी

करोना काळात बाधितांना प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांची नोंदणी करण्यात आली असून, विभागात ९३ हजार ३०९ आरोग्यसेवकांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कोविशिल्डचा पहिला डोस प्राधान्याने देण्यात येत आहे. नोंदणी झालेल्या जिल्हानिहाय आरोग्य सेवकांमध्ये नागपूर शहरातील २५ हजार १६४ तर नागपूर ग्रामीण भागातील ९ हजार १६९ अशा ३४ हजार ३३३ जणांचा समावेश आहे. वर्धा जिल्’ातील १६ हजार ७५४, भंडारा ७ हजार ६०२, चंद्रपूर १६ हजार ११०, गडचिरोली ९ हजार ९४७ तर गोंदिया जिल्’ातील ८ हजार ५६३ आरोग्यसेवकांची नोंदणी झाली आहे.