28 September 2020

News Flash

Coronavirus : शहरात १३ बाधितांचा मृत्यू

सोमवारी दिवसभरात तब्बल २४६ जणांना करोनाची बाधा झाली आहे.

संग्रहित छायाचित्र

करोनाचे २४६ नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ६१४३

नागपूर : नागपुरात करोनाबाधित व मृत्यूसंख्या झपाटय़ाने वाढत असून सोमवारी एकाच दिवशी तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला, तर नवे २४६  बाधित आढळलेत. या रुग्णांमध्ये ६६ ग्रामीण तर १८० शहरातील आहेत. एकूण रुग्णसंख्या ६१४३ झाली असून एकूण मृत्यूसंख्या १७२ झाली आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या चाचण्यांच्या अहवालातून ६० जणांना करोनाची लागण झाली होती. मात्र सायंकाळी  यात भर पडून २४६ जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. दिवसभरात मेयोत ५ तर मेडिकलमध्ये ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दहेगाव येथील ६२ वर्षी महिलेला २७ जुल रोजी मेयोत दाखल केले होते. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर यशोदानगर येथील ३५ वर्षीय युवकाला १ तारखेला मेयोत दाखल केले होते. मात्र त्याचाही मृत्यू झाला. जरीपटका येथील ६८ वर्षीय महिलेला २२ जुल रोजी करोनाचे निदान झाले होते. त्यामुळे महिलेवर मेयोत उपचार सुरू होते. मात्र ती देखील उपचारादरम्यान दगावली. अंसार नगर येथील २८ वर्षी युवा युवतीला १ तारखेला दाखल केले होते. मात्र दोन दिवसात तिचा मृत्यू झाला. तर दत्तवाडी येथील एका ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. तर मेडिकलमध्ये वानाडोंगरीच्या ६५ वर्षीय पुरुष, कामठीच्या कुंभार कॉलनीतील ५० वर्षीय महिला, सूर्यानगर येथील ७२ वर्षी पुरुष, धरमपेठ येथील ४९ वर्षीय परुष, हिंगणा येथील ५० वर्षीय महिला, गरोबा मैदान येथील ४५ वर्षीय पुरुष, भालदारपुरा येथील ६२ वर्षीय महिला तसेच टिमकी येथील ६१ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सोमवारी दिवसभरात तब्बल २४६ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहरात एकूण करोनाबाधितांची संख्या ६१४३ वर पोहचली असून १७२ जणांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. सोमवारी मेयोच्या प्रयोगशाळेतील अहवालानुसार एकूण ६२ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून मेडिकलमध्ये ७७, एम्समध्ये ४८, माफसु १६, अ‍ॅन्टीजेन चाचणीत २८ तर खासगी प्रयोगशाळेच्या चाचणीत १५ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. तर दिवसभरात १३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरात आतापर्यंत एकूण ३७५४ रुग्ण बरे झाले आहेत.जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.११ टक्के आहे.

तीन पोलिसांना करोना

शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत कार्यरत दोन कर्मचाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. यामुळे गुन्हे शाखेत खळबळ उडाली आहे. बाधित पोलिसांत  लकडगंज पोलीस ठाण्यातील  एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाची काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावली. त्यानंतर सोमवारी गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांसह २६ पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात तिघे बाधित निघाले. गुन्हे शाखेतील एका कर्मचाऱ्याची पत्नीही  बाधित आहे. सर्वाना तातडीने ‘गृह विलगीकरणात’ पाठवण्यात आले.

विभागनिहाय रुग्ण

*   लक्ष्मीनगर – ५

*   धरमपेठ – ८

*   हनुमाननगर – ४

*   धंतोली – २

*   नेहरूनगर – ३

*   गांधीबाग – १५

*   सतरंजीपुरा – ५

*   लकडगंज – ६

*   आशीनगर – ३४

*    मंगळवारी -१७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 12:47 am

Web Title: 13 corona patients death in the nagpur city zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 आता घराजवळच ‘करोना चाचणी केंद्र’
2 करोनाला घाबरू नका, सकारात्मकतेने तो बरा होतो..
3 खासगी रुग्णालयांवर महापालिकेचा ‘वॉच’
Just Now!
X