12 November 2019

News Flash

सावत्र पित्याकडून मुलीवर बलात्कार

आई मजुरीवर गेल्यानंतर आरोपी पीडितेला दुपारच्या सुमारास एकटय़ात गाठायचा व अश्लील चाळे करायचा.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : सावत्र वडिलाने १३ वर्षांच्या मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना यशोधरानगर पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

नराधम सावत्र वडीलांचा पहिला विवाह झाला असून पहिल्या पत्नीसोबत त्याचा संसार सुरू असताना गेल्यावर्षी त्याचे एका घटस्फोटित महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला एक मुलगा व मुलगी आहे. तिच्याशीही त्याने विवाह करून तिलाही पहिल्या पत्नीसोबत एकाच घरी ठेवले. तिची मुलेही सोबत राहायची.

दरम्यान, आई मजुरीवर गेल्यानंतर आरोपी पीडितेला दुपारच्या सुमारास एकटय़ात गाठायचा व अश्लील चाळे करायचा. तिने कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. २२ मे २०१९ ला घरात कणीच नसताना आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती घाबरलेली होती. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिची काळजीने विचारपूस केली. त्यावेळी तिने सर्व हकिकत सांगितली. शेजारच्या महिलेने तिच्या आईला सांगितले.त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

First Published on July 11, 2019 2:49 am

Web Title: 13 year old girl raped by stepfather in nagpur zws 70