28 September 2020

News Flash

Coronavirus : पुन्हा १५ बाधितांचा मृत्यू!

२६९ नवीन रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या ६,७५२

संग्रहित छायाचित्र

२६९ नवीन रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या ६,७५२

नागपूर : शहरात बुधवारी पुन्हा तब्बल १५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे आता एकूण मृतांची संख्या २०४ वर पोहचली आहे. याशिवाय दिवसभरात २६९ नवे करोनाग्रस्त आढळले असून आतापर्यंतच्या बाधितांची एकूण संख्या ६,७५२ वर गेली आहे.

बुधवारी दिवसभरात मेयो रुग्णालयात ८ जण तर मेडिकलमध्ये ६ जण  दगावले. मेयोत नालसाब चौक येथील ६२ वर्षीय महिलेला २ तारखेला  दाखल केले होते. आज बुधवारी तिचा  मृत्यू झाला. मेनन कॉलनी कामठी येथील ८२ वर्षीय महिलाही दगावली. लष्करीबाग येथील ४६ वर्षीय पुरुषाचाही मेयोत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोमीनपुरा येथील २२ वर्षीय युवतीचा मेयोत ४ तारखेला मृत्यू झाला. मात्र आज तिचा अहवाल सकारात्मक आला. इतवारी येथील ७७ वर्षांच्या पुरुषाचाही करोनामुळे मृत्यू झाला. कामठीच्या २६ वर्षीय महिलेचाही करोनामुळे मृत्यू झाला. इतवारी येथील ७१ वर्षी पुरुषालाही दोन दिवसांपूर्वी मेयोत दाखल केले होते मात्र बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाल येथील ५३ वर्षीय पुरुषाचाही मेयोत मृत्यू झाला.

मेडिकलमध्ये ६ करोना रुग्ण दगावले. यामध्ये मध्यप्रदेश येथील एक ५८ वर्षीय महिला, अमरावती येथील ५३ वर्षीय महिला, नागपूर येथील ५५ वर्षीय पुरुष, पारडी येथील ५५ वर्षीय पुरुष, सोमवारीपेठ येथील ४२ वर्षीय महिला आणि अयोध्यानगर येथील ७८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मृत पावलेल्यांपैकी १ ग्रामीणचा असून १४ शहरातील आहेत. दिवसभरात ८३ रुग्ण बरे होऊन घरी परत गेले असून आतापर्यंत एकूण ३,९३३ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८.२४ टक्के आहे.

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्या – आयुक्त

शहरात दररोज  करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांश रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे बाधित आणि मृत रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यावर भर द्या, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांनी मंगळवारी सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची चाचणी करावी. कोणी बाधित आढळला व  लक्षणे नसल्यास घरीच विलगीकरणात ठेवावे आणि लक्षणे असतील तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात यावे. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार करतात, असे आढळून आल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधित  रुग्णालयावर कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त कार्यालयातही करोना

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीतील वस्रोद्योग विभागाच्या कार्यालयातील  दोन कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना गृह विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. नवीन प्रशासकीय इमारतीतील जनसंपर्क विभागातील एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकालाही करोनाची बाधा झाली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना बाधा झाली होती.

सहायक आयुक्तांसह १० बाधित

महापालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये सहायक आयुक्तांसह १० करोना बाधित आढळले. त्यामुळे  दोन दिवस झोनमधील व्यवहार बंद राहणार आहेत. १० कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असून त्यांची चाचणी केली जात आहे.

झोननिहाय आढळलेले रुग्ण

*  लक्ष्मीनगर – १९

*  धरमपेठ – १२

*  हनुमाननगर – ४३

*  धंतोली- ४३

*  नेहरूनगर – ३३

*  गांधीबाग- २५

*  सतरंजीपुरा – १८

*  लकडगंज – २४

*  आशीनगर- ३४

*   मंगळवारी -४१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 1:08 am

Web Title: 15 death in a day due to coronavirus in nagpur zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 मॉल उघडले, व्यावसायिक संकुले बंदच!
2 लोकजागर : विकासाचे ‘विलगीकरण’!
3 एसईबीसी आरक्षण अंमलबजावणीच्या शासन निर्णयात त्रुटी
Just Now!
X