25 September 2020

News Flash

१५ लाख हेक्टरवर पीक हानी, पंचनामे होणे बाकी

आज केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

(संग्रहित छायाचित्र)

आज केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

नागपूर : नागपूरसह पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्य़ात पुरामुळे सरासरी १५ लाख हेक्टरवरील पीक बुडाले असून अद्याप पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. दरम्यान, शुक्रवारपासून केंद्रीय पथक या भागाचा दौरा करण्यासाठी नागपुरात येत असून ते दोन चमूत विभागून पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहे.

ऑगस्टच्या २९ ते ३१ तारखे दरम्यान पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातील ३४ तालुक्यांमध्ये १५ लक्ष ४२ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भातील धान पट्टय़ाचे यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून पाठोपाठ कापूस उत्पादकांनाही मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे पाटबंधारे विभाग, ऊर्जा विभाग, पाणीपुरवठा विभाग यांचे देखील मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्य़ात पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिके  पाण्यात बुडाली, नागपूर जिल्ह्य़ात कन्हान, पेंच तर भंडारा, गोंदिया,  चंद्रपूर जिल्ह्य़ात वैनगंगेच्या काठांवरील गावात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे १५  लाख हेक्टरवरील पिकांना पुराचा फटका बसला. नागपूर जिल्ह्य़ात १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. भंडारा जिल्ह्य़ात तीन दिवस शेकडो गावे पाण्याखाली होती. त्यामुळे तेथील पंचनाम्याचे काम अडले. अशीच स्थिती पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्य़ांची सुद्धा आहे.

या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी नागपूरमध्ये येत असून त्यात सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते  ११ ते १३ सप्टेंबपर्यंत पाहणी करणार आहे. पहिल्या दिवशी नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याला भेट देणार आहे. शुक्रवारी  विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांकडून दुपारी १२ वाजता पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दोन चमूमध्ये प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात होईल. एक पथक नागपूर व दुसरे चंद्रपूर या जिल्ह्याची पाहणी करणार आहे.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबरला भंडारा, गोंदिया या ठिकाणी एक पथक तर दुसरे पथक गडचिरोली जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करणार आहे. १३ सप्टेंबरला पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:01 am

Web Title: 15 lakh hectare crop loss due to flood but survey still pending zws 70
Next Stories
1 चाचणी केंद्रांवर आता बाह्य़ रुग्ण विभाग
2 लोकजागर : नाकर्तेपणाचा ‘उद्रेक’!
3 जास्त रक्कम भरण्याची तयारी दर्शवताच रुग्णाला आत घेतले 
Just Now!
X