27 November 2020

News Flash

नागपूर विभागीय अंतिम फेरीत १६ विद्यार्थ्यांची निवड

आपले विद्यार्थी कुठेतरी साादरीकरणात कमी पडतात. विद्यार्थ्यांना नेमका विषय मांडला पाहिजे.

दोन दिवस सुरू असलेल्या लोकसत्ताच्या वक्ता दशसहस्रेषु या वक्तृत्व कलेचा जागर रविवारी सायंकाळी झाला आणि त्यातून १६ विद्यार्थ्यांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. प्राथमिक फेरीत विद्यार्थिनींचे प्राबल्य होते. त्यातून नऊ मुलींची विभागीय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. अगदी गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूरहून त्यांच्या पालकांनी स्पर्धेला हजेरी लावली होती, हे विशेष.

यात न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी वेदांत चट्टे, निकालस महिला महाविद्यालयाची शिवानी पांडे, श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाची सायली पेशवे आणि राधा देशकर, वध्र्याच्या यशवंत महाविद्यालयाची पूजा फाळके, अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचा आशीष कांबळे, भंडाऱ्याच्या जे.एम. पटेल कॉलेजची नेहा हटवार, अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अनिकेत अनिल  गडेकर, हिस्लॉप कॉलेजचा आशीष माकडे, पिंजरच्या भाऊसाहेब लहाने महाविद्यालयाचा प्रतीक महल्ले, अकोला कृषी महाविद्यालयाचा मंथन बिजवे, श्रुती तायडे, एलएडी कॉलेजच्या आकांक्षा वाखले आणि अनन्या आचार्य, अकोल्याच्या शिवाजी आर्टस आणि कॉमर्स कॉलेजचा विशाल नंदागवळी आणि गडचिरोलीच्या महिला महाविद्यालयाची नुरसबा सय्यद या सोळा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

‘लोकसत्ता’ आयोजित आणि वीणा वर्ल्ड प्रस्तुत व ‘पॉवर्ड बाय’ बँक ऑफ महाराष्ट्र, दि विश्वेश्वर को-ऑप. बँक लिमिटेड, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट- औरंगाबाद) ‘एमआयटी’चे (औरंगाबाद) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सुरू असून येत्या १० फेब्रुवारीला विभागीय अंतिम फेरी आयोजित करण्यात आली असून महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारीला होणार आहे. स्पर्धेला परीक्षक म्हणून भाग्यश्री पेठकर आणि रमन सेनाड लाभले होते.

नागपूर विभागीय अंतिम फेरी येत्या १० फेब्रुवारीला होणार आहे. विनोबा विचार केंद्रात दुपारी १ वाजता सुरू होणाऱ्या या फेरीत दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवायची आहे.

आपले विद्यार्थी कुठेतरी साादरीकरणात कमी पडतात. विद्यार्थ्यांना नेमका विषय मांडला पाहिजे. उगाचच अंगात त्वेष, अभिनिवेश आणून बोलण्याची काहीच गरज नसते किंवा हातवारे करण्याचीही गरज नसते. पोपटपंची तर नकोच नको. अर्थात त्यासाठी महाविद्यालयांमधूनच थोडी मेहनत घ्यायला हवी. पण महाविद्यालयेही केवळ नावे पाठवून देतात. मुलांना पाहिजे तसे मार्गदर्शन करीत नाहीत. विद्यार्थ्यांला विषयाचा अभ्यास असेल तर मांडताही व्यवस्थित येतो. त्यामुळे अभ्यास हवाच!

– भाग्यश्री पेठकर, परीक्षक

विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून ‘लोकसत्ता’ने एक चांगलं पाऊल उचलले आहे. आजच्या आयटीच्या युगात विद्यार्थ्यांनी वाचन, अभ्यास करून समाजासमोर मते मांडवी आणि त्यातून पिढी घडावी, अशी भावना लोकसत्ताची आहे. वैदर्भीय विद्यार्थ्यांमध्ये विचार प्रतिभा भरपूर असली तरी अभ्यास आणि जिद्द कमी पडते. महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धामध्ये आठ ते दहा विद्यार्थी असतात. मात्र, याठिकाणी विद्यार्थ्यांची भरमार दिसते. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर संस्कार करण्याचे प्रयत्न आवश्यक असतात. असे संस्कार करण्याचे काम लोकसत्ता करीत आहे.

– रमन सेनाड, परीक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 2:32 am

Web Title: 16 students selected for final round in loksatta oratory competition in nagpur
Next Stories
1 ‘सायको किलर’ची दहशत खरी किती, खोटी किती?
2 अवयव प्रत्यारोपणाला चळवळीचे स्वरूप यावे
3 आर्थिक सुधारणांच्या निर्णयांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष – गिरीश कुबेर
Just Now!
X