नागपूर : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी)नागपूर वेस्ट मॅनेजमेंट प्रा.लि. या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १९२.७९ कोटी रुपये अर्थसहाय्य देऊ केले आहे.
महानिर्मितीच्या खापरखेडा आणि कोराडी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पांना लागणाऱ्या १५० एम.एल.डी. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीवर (पीपीपी) हा प्रकल्प प्रथमच ‘नॅशनल टेरिफ पॉलिसी २०१६’अंतर्गत राबवला जाणार असून तो २०२० पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा वापर ऊर्जा प्रकल्पातील राख हाताळणी व शीतलीकरण अशा विशिष्ट कामांसाठी करून ऊर्जा निर्मितीसाठी स्वच्छ पाण्यावरचे अवंलबित्व कमी करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. महानिर्मितीला सांडपाण्याचे वितरण केल्याने नागपूर महापालिकेसही आर्थिक मोबदला प्राप्त होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 3:55 am