वाघिणीचा शोध सुरू

ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडी मेंढाच्या कक्ष क्रमांक १४०७ मध्ये अतिशय नाजूक स्थितीत मिळालेले वाघिणीच्या अवघ्या २२ दिवसाच्या बछडय़ाने सायंकाळी सातच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्याचा जीव वाचविण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडी मेंढा राऊंड अंतर्गत मारेगाव बिटातील कक्ष क्रमांक १४०७ चे रस्त्यालगत अवघ्या २२ दिवसांचे वाघिणीचे पिल्लू शनिवारी दुपारी अतिशय नाजूक स्थितीत मिळाले. यावेळी वाघीण कुठेही दिसली नाही. या घटनेची माहिती लागलीच सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व चंद्रपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांना मिळताच त्यांनी धाव घेतली. दरम्यान, यावेळी वनपथक बराच वेळ  वाघिणीची प्रतीक्षा करत होते, परंतु २-३ होऊनही वाघीण आलीच नाही. शेवटी वनपथकाने बघितल्यावर बछडय़ाची प्रकृती अधिक चिंताजनक होती, त्यामुळे ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व डॉ. प्रशांत देशमुख यांनी प्रकृतीची तपासणी केली. ते अतिशय कुपोषित असल्याने त्याला उभे राहणे आणि चालणेही होत नव्हते. यावेळी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून व गस्त घालून वाघिणीचा शोध घेण्यात आला. मात्र ती दिसलीच नाही.

दरम्यान, सायंकाळी ६.३० नंतर या बछडय़ाची प्रकृती अधिक बिघडल्याने शर्थीच्या प्रयत्नानंतरही सात वाजताच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला.  त्याचा मृतदेह ब्रम्हपुरी वन विभागात डिप फ्रिजरमध्ये ठेवण्यात आलेला आहे. रविवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाघीण ही एका वेळी दोनपेक्षा अधिक बछडय़ांना जन्म देते, त्यामुळे जंगलात याच्यासोबतो आणखी एक बछडे आहे काय, याचाही शोध वनपथक घेत आहेत.