News Flash

बारा वर्षीय मुलीसह दोघींवर बलात्कार

आरोपीने तिला अडवले व एका इमारतीच्या निर्माणाधीन दुसऱ्या माळ्यावर तिच्यावर बलात्कार केला.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह दोघींवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सीताबर्डी व सक्करदरा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आल्या. सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सक्करदरा पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्य़ातील आरोपी फरार आहे.

राकेश हरीश शाहू (२३) असे सीताबर्डी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा कॅटरिंगचे काम करतो. पीडित मुलीच्या शाळेला सध्या सुटय़ा लागल्या असल्याने ती मैत्रिणीकडून चित्रपट बघून आपल्या घरी जात असताना आरोपीने तिला अडवले व एका इमारतीच्या निर्माणाधीन दुसऱ्या माळ्यावर तिच्यावर बलात्कार केला. तिचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर कुणाकडे वाच्यता केल्यास अश्लील छायाचित्र फेसबुकवर टाकून बदनामी करण्याची धमकी केली. ती घरी परतली. आईने तिची चौकशी केली. त्यावेळी तिने सर्व हकिगत सांगितली. आईने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल चव्हाण यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

सक्करदरा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आलेल्या प्रकरणी प्रकाश हटवारी लाडे (३२) रा. आर्वी नाका असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा ब्रम्हपुरी तालुक्यातील सायगाव येथील रहिवासी आहे. तो सध्या  हजारी पहाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीला आहे. पीडित एका रुग्णालयात परिचारिका असताना २०१७ मध्ये आरोपी लाडे आपल्या एका मित्राच्या मदतीने तिला भेटला होता.

तेव्हापासून त्यांच्यात मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले व वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. एकदा त्याने पीडित मुलीच्या आईवडिलांकडून ३७ हजार रुपये मागितले. आरोपी हा पीडितेशी विवाह करणार असल्याने तिच्या आईवडिलांनी त्याला जावई समजून पैसे दिले होते. आता आरोपी लग्नास नकार देतो. तिने पोलिसांत तक्रार दिली. सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय मसराम यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 2:46 am

Web Title: 23 year old boy arrested for raping minor girl in nagpur
Next Stories
1 रागात धक्का दिल्याने सख्ख्या भावाचा मृत्यू
2 अपघातमुक्तीसाठी रस्ते अभियांत्रिकी सुधारण्याची गरज
3 पाणपोई तयार, पण पाणीच नाही!
Just Now!
X