ऑक्सिजनच्या किंमतीत २५ ते ३० टक्के वाढ

नागपूर : मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की वस्तूंच्या किं मती वाढतात. व्यापारातील हे सूत्र अलीकडच्या काळात वैद्यकीय सेवेतही दिसू लागले आहे. करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने व त्यांना ऑक्सिजनची गरज असल्याने पुरवठादार कं पन्यांनी त्यात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ के ली आहे.  शहरातील काही रुग्णालये ऑक्सिजनचा साठा करून ठेवत असल्याचा दावाही पुरवठादारांनी के ला आहे.

महापौर व करोनाच्या संदर्भात उच्च न्यायालयाने नियुक्त के लेल्या समितीचे प्रमुख संदीप जोशी यांनी मंगळवारी ऑक्सिजन पुरवठादार कं पन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आय.एम.ए.च्या अध्यक्षा डॉ. अर्चना कोठारी  आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश गडेकर उपस्थित होते.

या बैठकीत ऑक्सिजन पुरवठादार कं पन्यांच्या प्रतिनिधींनी दरवाढीमागची कारणे विशद के ली. भिलाई येथून कच्चा माल आणण्यासाठी होणारा वाहतूक खर्च, अत्यावश्यक सेवेमुळे चोवीस तास काम करावे  लागत असल्याने मनुष्यबळावर होणारा वाढीव खर्च, निर्जंतुकीकरण आणि इतरही खर्चात वाढ झाल्याने ऑक्सिजन सिलिंडरच्या किं मतीत २५ ते ३० टक्के वाढ  करावी लागली, असे पुरवठादारांनी स्पष्ट के ले.  यावर महापौरांनी त्यांना सहकार्य करण्याची विनंती के ली व ती त्यांनी मान्य केली.

आरोग्यमंत्री टोपे उद्यापासून विदर्भाच्या दौऱ्यावर

विदर्भात नागपूरसह इतरही जिल्ह्य़ात करोनाचे रुग्ण वाढल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे गुरुवारी २४ सप्टेंबरपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.  टोपे गुरुवारी सकाळी ११.३० वाजता  मुंबईहून नागपूरला येतील व  थेट विमानतळावरून ते भंडाऱ्याकडे प्रयाण करतील. दिवसभर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन आढावा घेतील. रात्री १०.३० वाजता नागपूरला परत येतील. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते विभागीय आयुक्त कार्यालयात ते नागपूर जिल्ह्य़ातील करोना स्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर दुपारी ते अमरावतीकडे रवाना होतील.

दोन रुग्णालये अधिग्रहित

हिंगण्यातील लता मंगेशकर हॉस्पिटल आणि शालिनीताई मेघे रुग्णालयांना विभागीय आायुक्त संजीवकु मार यांनी करोना रुग्णांवरील उपचारासाठी अधिग्रहित के ले आहे. जम्बो  रुग्णालये उभारण्यापूर्वी जिल्ह्य़ात असलेल्या सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांच्या पूर्ण क्षमतेने वापर होतो किं वा नाही, हे पाहण्याची जबाबदारी शासनाने विभागीय आयुक्तांवर टाकली आहे. त्यानुसार त्यांनी नुकतीच एक बैठक घेतली व  त्यात नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना या रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सांगितले.

करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिनजनची मागणी सुद्धा वाढली आहे. भविष्यात त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना महापौर आणि करोनाच्या संदर्भात उच्च न्यायालयाने नियुक्त के लेल्या समितीचे प्रमुख संदीप जोशी यांनी ऑक्सिजन पुरवठादार कं पन्यांच्या मालकांना दिल्या.