31 October 2020

News Flash

२७ नवीन संशयित रुग्णालयात

संबंधितांना शोधण्यात प्रशासनाची दमछाक

संग्रहित छायाचित्र

नवीन करोनाग्रस्ताच्या संपर्कातील लोकांचाही समावेश; संबंधितांना शोधण्यात प्रशासनाची दमछाक

उपराजधानीत गुरुवारी आढळलेल्या पाचव्या करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्यांसह इतर करोनाची लक्षणे असलेल्या तब्बल २७ जणांना मेडिकल, मेयोत  दाखल करण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील इतरही व्यक्तींना शोधण्यात प्रशासनाची गुरुवारी चांगलीच दमछाक उडाली.

उपराजधानीत पाचवा करोनाचा रुग्ण आढळल्यावर प्रशासनाकडून तातडीने त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा इतिहास जाणून घेणे सुरू झाले. त्यानंतर प्रथम या रुग्णाच्या घरातील चौघांसह त्याच्यासोबत दिल्लीला गेलेल्या त्याच्या कर्मचाऱ्याला तातडीने मेयोत दाखल करण्यात आले.

दुसरीकडे मेयोत इतरही करोनाशी संबंधित लक्षणे असलेल्या तब्बल १० इतर रुग्णांना दाखल करण्यात आले. मेयोत रुग्ण वाढत असल्याचे बघत या रुग्णांशी संबंधित वार्डाची संख्या आता तीन करण्यात आली आहे.

दुसरीकडे मेडिकलमध्येही या रुग्णाच्या संपर्कातील काही व्यक्तींसह एकूण १२ नवीन रुग्णांना गुरुवारी दाखल करण्यात आले. या सगळ्यांचे नमुने  मेयोतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून रात्री उशिरा त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान गुरुवारी करोना विषाणूची लागण झाल्याचे पुढे आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सगळे व्यक्ती निदर्शनात आले असून त्यांना लवकरच तपासणीला आणून या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 12:31 am

Web Title: 27 new suspect in hospital abn 97
Next Stories
1 मदत हवी आहे,पोलिसांशी संपर्क करा!
2 नागपुरातील १२ औषध दुकाने २४ तास सेवा देणार
3 औषध दुकानांमध्ये ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’ गोळ्यांचा तुटवडा
Just Now!
X