हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाणला वरिष्ठांकडून एक-दोन नाही तर तब्बल २७ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक ही कारवाई के ली जात असल्याने जानेवारी २०२१ मध्ये ती वैद्यकीय रजेवर गेली. मात्र, तिला परत बोलावण्यात आले आणि त्यानंतर अवघ्या अडीच महिन्यात दीपालीला आत्महत्या करावी लागली.

दीपाली कर्तव्यात सर्वात पुढे होती. पुनर्वसन, अतिक्र मण अशा सर्व जबाबदाऱ्या तिने कार्यकक्षेत राहूनच पार पाडल्या. मात्र, अनेकदा तिला अतिक्र मण, पुनर्वसनासाठी तोंडी आदेश दिले जायचे. या आदेशाची अंमलबजावणी तिने करावी यासाठी वरिष्ठांचा नेहमीच दबाव असायचा. तत्कालीन उपवनसंरक्षक शिवकु मारच नाही तर तत्कालीन क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडूनही तिला बरेचदा तोंडी आदेश दिले जात असल्याची माहिती आहे.  या आदेशाचे पालन करताना अनेकदा अडचणी येत होत्या. तिच्या सहकाऱ्यांजवळ तिने या गोष्टी  बोलूनही दाखवल्या. तिच्यावर दाखल होणाऱ्या कारणे दाखवा नोटीसबाबतही ती सहकाऱ्यांना सांगायची, असे आता समोर आले आहे. मांगियाचे अतिक्र मण काढण्याबाबतही तिला शिवकु मारने तोंडी आदेश दिले होते. गावकऱ्यांना त्याबाबत नोटीस मिळाली नव्हती. त्यामुळे दीपाली त्याठिकाणी गेल्यानंतर गावकऱ्यांनी तिला घेरले आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल के ला. शासकीय कामामुळेच तिच्यावर गुन्हा दाखल झाल्याने वरिष्ठांनी तिला मदत करणे  अपेक्षित होते. मात्र, त्यांनीही  सहकार्य के ले नाही. त्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये एक महिन्याची वैद्यकीय रजा घेऊन दीपाली गावी निघून गेली. यादरम्यान तत्कालीन क्षेत्र संचालकांनी तिला परत बोलावले. पुनर्वसनाचे काम आधी पूर्ण कर, असा तोंडी आदेश दिला. त्यांच्या आदेशाचे तिने पालन के ले. परतल्यानंतर तिने रेड्डी यांची भेट घेतली आणि शिवकु मारांकडून त्रास होत असल्यामुळे आपल्याला काम करणे शक्य  नसल्याचे सांगितले. त्यावर शिवकु मार यांच्याकडून तुला त्रास होणार नाही असे तोंडी आश्वासन रेड्डी यांनी दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवत तिने काम सुरू के ले, पण शिवकु मारचा त्रास थांबला नाही. अखेर अवघ्या अडीच महिन्यात दीपालीने आत्महत्या के ली.

संरक्षण कुटीत काय घडले?

बेलकुंड/खारी संरक्षण कुटी येथे शिवकु मार हा रात्रीबेरात्री दीपालीला बोलावत होता. वैद्यकीय रजा अर्ध्यावर सोडून कामावर परतल्यानंतर तिला या संरक्षण कुटीत बोलावण्यात आले होते. यावेळी लोकप्रतिनिधी आणि तत्कालीन मंत्री देखील हजर असल्याची माहिती आहे. यानंतरच तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्यामुळे या भेटीत नेमके काय घडले हे गुपित कायम आहे.