२४ तासांत ७ मृत्यू; २८२ नवीन रुग्ण
नागपूर : जिल्ह्य़ात दिवसभरात ७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर २८२ नवीन रुग्णांची भर पडली . नवीन मृत्यूंमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोना बळींची संख्या अडतीसशे पार गेली आहे.
नवीन मृत्यूंमध्ये शहरातील ३, ग्रामीणचा १, जिल्हय़ाबाहेरील ३ अशा एकूण ७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ५९३, ग्रामीण ६६१, जिल्हय़ाबाहेरील ५५० अशी एकूण ३ हजार ८०४ वर पोहचली आहे. दिवसभरात शहरात २१२, ग्रामीण ६७, जिल्हय़ाबाहेरील ३ असे एकूण २८२ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील बाधितांची संख्या ९२ हजार ९९३, ग्रामीण २३ हजार ७६८, जिल्हय़ाबाहेरील ७३२ अशी एकूण १ लाख १७ हजार ४९३ वर पोहचली आहे.
त्यातच जिल्ह्य़ात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनिक करोनाबाधितांहून करोनामुक्तांची संख्या अधिक नोंदवली गेल्याने आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला आहे.
करोनामुक्तांचे प्रमाण ९१.८७ टक्के
शहरात दिवसभरात २६०, ग्रामीणला ५८ असे एकूण ३१८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ८५ हजार ४९८, ग्रामीण २२ हजार ४५२ अशी एकूण १ लाख ७ हजार ९५० वर पोहचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९१.८७ टक्के आहे, तर आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, शहरात ४ हजार ९०२, ग्रामीणला ८३७ असे एकूण ५ हजार ७३९ बाधितांवर घरी वा रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
विदर्भातील मृत्यू
(१४ डिसेंबर)
जिल्हा मृत्यू
नागपूर ०७
वर्धा ०२
चंद्रपूर ०१
गडचिरोली ००
यवतमाळ ०२
अमरावती ००
अकोला ०१
बुलढाणा ०१
वाशीम ००
गोंदिया ००
भंडारा ०३
एकूण १८
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2020 12:58 am