News Flash

‘लोकमत’ भवनासह ३२ इमारती असुरक्षित

या असुरक्षित इमारतींमध्ये जनता चौकातील ‘लोकमत’च्या तेरा मजली इमारतीचा समावेश आहे.

 

 • आगप्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष
 • महापालिकेच्या अग्निशमन विभागाची नोटीस

सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील विविध भागातील रुग्णालये, मॉल्स आणि इतर व्यावसायिक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे आवश्यक असताना दोनशेपेक्षा अधिक इमारतींमध्ये नियमाचे पालन न करता अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली नाही. अनेकदा नोटीस देऊन त्यांनी नियमाचा भंग केल्यामुळे अशा शहरातील ३२ इमारतींना नोटीस देऊन त्यांना असुरक्षित जाहीर करण्यात आले आहे. या असुरक्षित इमारतींमध्ये जनता चौकातील ‘लोकमत’च्या तेरा मजली इमारतीचा समावेश आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने मंगळवारी आगप्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे इमारत असुरक्षित असल्याची त्यांना नोटीस बजावली आहे.

शहरात मोठय़ा इमारतीचे बांधकाम केल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या वर्षांत शहरातील काही मान्यवर डॉक्टरांच्या मोठय़ा रुग्णालयासह काही व्यावसायिक इमारती आणि मॉल्सने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या इमारतींमध्ये लोकांचा वावर असतो.

त्या ठिकाणी साधारणत: वॉटर बेस फायर सिस्टम, हायड्रन्ट, मोझील सिस्टमसह अग्निशमन यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. मात्र, अनेक उंच इमारतींमध्ये या सोयीसुविधा करण्यात आल्या नाहीत.

अशा दोनशेपेक्षा अधिक इमारती शहरामध्ये असून त्याची तपासणी केली जात आहे. महापालिकेने मंगळवारी शहरातील अशा ३२ इमारतींना नोटीस पाठवल्या असून त्यात लोकमतच्या तेरा मजली इमारतीचा समावेश आहे. जानेवारी २०१५मध्ये तेरा मजली इमारतीला आगप्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजनांसंबंधी नोटीस दिली होती. दिलेल्या मुदतीत त्याकडे दुर्लक्ष केल्याने या इमारतीतून तात्काळ निघून जाण्यासाठी महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी पुन्हा त्यांना नोटीस दिली आहे.

याशिवाय शुक्रवार तलावाजवळील दि विदर्भ प्रिमियर को-ऑप. सोसायटी, लकडगंजमधील देवजीभाई पटेल यांचे भूवनेश्वरी भवन, गायत्री टॉवर, रामदासपेठ भागातील क्रिम्स हॉस्पिटल, आंबेडकर चौकातील रेडियन्स रुग्णालय, जुनी शुक्रवारी परिसरातील डॉ. आकाश बल्की यांचे

श्री हॉस्पिटल अ‍ॅन्ड क्रिटीकल केअर सेंटर, सीताबर्डी भागातील मातृ सेवा संघ आदी इमारती असुरक्षित म्हणून जाहीर करण्यात आल्या असून त्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

असुरक्षित इमारती

 • लोकमत भवन
 • विदर्भ प्रिमियर को-ऑप. सोसायटी, शुक्रवार तलाव
 • क्रिटीकल केअर सेंटर, जुनी शुक्रवारी व दारोडकर चौक
 • मातृ सेवा संघ, सीताबर्डी
 • खळतकर रुग्णालय, उमरेड रोड
 • शिरभाते रुग्णालय, गणेशनगर
 • क्युअर इट हॉस्पिटल, दिघोरी
 • आस्था रुग्णालय, उमरेड रोड
 • सुनील अंबुलकर प्लाट क्रमांक ७९, बजाजनगर
 • डियन्स रुग्णालय, आंबेडकर चौक
 • मातृत्व रुग्णालय, त्रिमूर्तीनगर
 • रहाटे सर्जीकल रुग्णालय, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू
 • आरोग्यम सुपर स्पेशालिटी
 • प्रेस्टीज नर्सिग होम, छावनी
 • जाफरी हॉस्पिटल, ताजबाग
 • क्रिम्स हॉस्पिटल, रामदासपेठ
 • श्रमण रुग्णालय, गुरुनानकपुरा
 • केशव रुग्णालय रिंग रोड, मानेवाडा
 • तिरुपती इंड्रस्टीज, वर्धमाननगर
 • नारायण व्हिजन डेव्हलपर्स, शांतीनगर
 • साई एज्युकेशन सोसायटी, प्रगतीनगर
 • टावरी इमारती, नरेंद्रनगर
 • गायत्री टॉवर, लकडगंज
 • भूवनेश्वरी भवन, लकडगंज
 • एन. कुमार प्रोजेक्ट अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर, अंलकार टॉकीजसमोर
 • पी.एम. पालीवाल आशीर्वाद कॉम्प्लेक्स, रामदासपेठ

प्रफुल्ल गजबे, बोरगाव

शहरातील विविध भागातील उंच इमारतीचे सर्वेक्षण सुरू असून पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ३२ इमारतींना असुरक्षित म्हणून जाहीर केले आहे. अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे या सर्व इमारतींना ठराविक कालावधी देण्यात आला असून त्या कालावधित त्यांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या केल्या नाही तर पुन्हा त्यांना नोटीस दिली जाईल.

बी.पी. चंदनखेडे, प्रभारी अग्निशमन अधिकारी, महापालिका, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:39 am

Web Title: 32 buildings unsafe in nagpur
Next Stories
1 ‘ऑनलाईन’च्या अटींमुळे बोगस संस्थांचे पितळ उघडे
2 उपराजधानीला डेंग्यूचा डंख!
3 स्वस्त डाळीचा लाभ फक्त सणासुदीच्या दिवसांपर्यंतच
Just Now!
X