News Flash

आता म्युकरमायकोसिसचे संकट

जिल्ह्य़ात साडेतीनशे रुग्ण

जिल्ह्य़ात साडेतीनशे रुग्ण

नागपूर : ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात ‘ब्लँक फंगस’ सोप्या भाषेत काळ्या बुरशीचे  नागपूर जिल्ह्य़ात सुमारे तीनशे ते साडेतीनशे रुग्ण आढळून आले  आहेत. करोना  झाल्यावर अनेकांना या आजाराने ग्रासले आहे. रुग्णांबाबत उपचार पद्धती निश्चित व्हावी, ग्रामीण भागातील खाजगी व सरकारी दवाखान्यातील सर्व वैद्यकीय कर्मचारी त्यादृष्टीने प्रशिक्षित व्हावे, या आजाराचे जनप्रबोधन व्हावे, यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तज्ज्ञ डॉक्टर व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीमध्ये  जिल्’ातील नाक, कान, घसा तज्ज्ञ (इएनटी असोशिएशन), दंत तज्ज्ञ (डेंटिस्ट), नेत्र तज्ज्ञ (आय स्पेशालिस्ट ) डॉक्टर संघटनांच्या प्रतिनिधींसह  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, तहसीलदार नीलेश काळे व महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते. तज्ज्ञांनी म्युकरमायकोसिस संदर्भात माहिती दिली. जिल्हय़ामध्ये किमान तीनशे ते साडेतीनशे रुग्ण आढळून आल्याचे स्पष्ट केले.  ग्रामीण भागातील जनतेला सोप्या शब्दांमध्ये समजेल अशी उपचार पद्धत व आजाराबद्दलची माहिती सहज उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

ग्रामीण भागातील खाजगी डॉक्टरांना तसेच अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यां व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आदींना आजाराबाबत माहिती द्यावी, आदी सूचना के ल्या. दरम्यान, राज्य सरकारवरील आजारासाठी लस खरेदी करणार आहे. काही  लसींचा तुटवडा आहे. त्याचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई के ली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

अशी आहेत लक्षणे

म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीसारखा असतो. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरडय़ांमध्ये तसेच छातीत देखील होऊ शकतो. डोळ्याच्या वरच्या पापणीला सूज येणे, पापणी खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे, नाकावर सूज येणे, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, डोळ्यांमध्ये वेदना, चावताना दात दु:खणे, ही या आजाराची लक्षणे आहेत. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह असलेल्यांना या नवीन आजाराचा धोका अधिक आहे.  करोना काळातील औषधांच्या वापरामुळे रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका संभवतो, अशी माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली. लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारांची गरज असते. अन्यथा एक ते दोन आठवडय़ांत ही बुरशी डोळे आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकते. डोळा, जबडा यासंदर्भात गंभीर परिणाम होऊ शकते.

त्यामुळे कोविड होऊन गेलेल्या रुग्णांनी त्यांचे तोंड व डोळे यांची तपासणी नियमित करावी. त्यातही ज्यांना मधुमेह असेल त्यांनी तातडीने तपासणी करावी, असे आज बैठकीतील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:24 am

Web Title: 3500 mucormycosis patients in the nagpur district zws 70
Next Stories
1 प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे सर्वाधिक खाटा नागपुरात
2 लहान मुलांवर लस चाचणीचे संकेत
3 लोकजागर : मोहफुलांची ‘मुक्ती’!
Just Now!
X