News Flash

‘मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारकडून ३७२.०८ कोटी’

केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून उर्वरित १ लाख ९२४८३ अर्ज निकाली काढण्यात येत आहेत. 

(संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारच्या वाट्याला आलेल्या निधीची वाट न पाहता राज्याने ३७२.०८ कोटी रुपये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी दिले आहेत, असा खुलासा सामाजिक न्याय विभागाने केला आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व तळागळातील विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात केंद्राच्या निधीची वाट न पाहता २०२०-२०२१ या वर्षांकरिताचे ३७२.०८ कोटी एवढा निधी आयुक्तालय समाजकल्याण यांना उपलब्ध करून दिला. वर्ष संपले तरी केंद्राकडून एक रुपयाही प्राप्त झाला नाही, असे वृत्त ‘लोकसत्ता’ने १ एप्रिल रोजी दिले होते. केंद्र शासनाने ६० टक्केच्या प्रमाणात ५५८ कोटी निधी ३० मार्च रोजी राज्य शासनास दिला आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून उर्वरित १ लाख ९२४८३ अर्ज निकाली काढण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 12:24 am

Web Title: 372 point 08 crore from state government for post matric scholarship abn 97
Next Stories
1 बाजारपेठबंदीचा गोंधळ!
2 तब्बल ३१.६७ टक्के अहवाल सकारात्मक
3 दीपालीने बदलीसाठी दिलेल्या पैशांचे काय झाले?
Just Now!
X