24 September 2020

News Flash

‘झिका’ विषाणूचा भारतालाही धोका

जागतिक आरोग्य संघटनेने ‘झिका’ विषाणूची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षतेचा इशारा दिला आहे.

भारतात अहमदाबादच्या (गुजरात) एका गर्भवती महिलेसह तामिळनाडू व इतर भागातील चौघांना झिका विषाणूची लागण झाल्याचे २५ जुलैला राज्यसभेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

चार रुग्ण आढळले; नवजात मुलांच्या मेंदूवर आघात

जागतिक आरोग्य संघटनेने ‘झिका’ विषाणूची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षतेचा इशारा दिला आहे. भारतातही या आजाराचे चार रुग्ण आढळले असून गर्भवतींना या विषाणूंचा सर्वाधिक धोका आहे. गर्भातील बाळाच्या मेंदूवर हे विषाणू घात करीत असल्याचे मेंदूरोग तज्ज्ञांच्या संघटनांचे म्हणणे आहे.

भारतात अहमदाबादच्या (गुजरात) एका गर्भवती महिलेसह तामिळनाडू व इतर भागातील चौघांना झिका विषाणूची लागण झाल्याचे २५ जुलैला राज्यसभेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. हा आजार सौम्य स्वरूपाचा असला तरी मेंदू आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करतो. गर्भवती महिला आणि तिच्या पोटातील बाळांकरिता हा विषाणू धोकादायक आहे. गर्भवतीला हा आजार जडल्यास नवजात बालकामध्ये मेंदूचा आजार होण्याची दाट शक्यता असते. या विषाणूमुळे मुलाच्या मेंदूची वाढ खुंटण्यासह मेंदूत विकृती येऊ शकते. त्यामुळे मुले मतिमंद होणे, अपस्माराचे झटके येणे आदी प्रकार संभवतात.

२०१५ मध्ये जगात ‘झिका’ विषाणूंच्या साथीमध्ये एकटय़ा ब्राझिलमध्ये १७ लाख रुग्ण नोंदवल्या गेले. त्यातील ३,५०० मुलांमध्ये मेंदू लहान असल्याचे निदर्शनात आले. जगातील ७० देशांत या विषाणूंचा प्रादुर्भाव असून आतापर्यंत ८० लाख लोक त्यामुळे पीडित आहेत. या विषाणूमुळे डेंग्यू व चिकन गुनिया सदृश्य आजारही संभावतो. यामुळे मज्जासंस्थेचा ‘ग्लुलेन बॅरी सिन्ड्रोम’ हा गंभीर आजारही होऊ शकतो. यात हातापायात कमजोरी येऊन श्वसनाचा त्रास होतो. या आजाराच्या २५ टक्के रुग्णांना उपचाराकरिता कृत्रिम श्वसन यंत्र लावण्याची गरज भासते. या आजारावरील औषध महाग असल्यामुळे व वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यताही असते.

भारतात झिका विषाणूंचे चार रुग्ण आढळले असून वेळीच काळजी न घेतल्यास विषाणूचा प्रसार वाढू शकतो. यामुळे नवजात बालकांचा मेंदू लहान होणे व गॅलेन बॅरी सिन्ड्रोम यासारखा दुर्धर आजार होतो. या विषाणूपासून होणाऱ्या आजारावर औषध किंवा प्रतिबंधात लस उपलब्ध नाही. त्यामुळे एडिस डासांची उत्पत्ती कमी करणे आणि डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे हे फार आवश्यक आहे.’

– डॉ. चंद्रशेखर मेश्राम, अध्यक्ष, वर्ल्ड न्युरोलॉजी संघटना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2017 1:00 am

Web Title: 4 patient affected with zika virus found in india
टॅग Zika Virus
Next Stories
1 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी पदमुक्त
2 खासगी बसची ऑटोरिक्षाला धडक; चौघांचा मृत्यू
3 मुलाच्या पोटातून खिळा तर मुलीच्या पोटातून घडय़ाळाचा सेल निघाला
Just Now!
X