27 September 2020

News Flash

नागपूरमध्ये दोन मुलींवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री चार वर्षांची मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत घरासमोर खेळत होती.

संग्रहित छायाचित्र

नागपूरमध्ये दोन लहान मुलींवर अज्ञात व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाचा शोध सुरु आहे. दोन्ही मुली या चार वर्षांच्या आहेत.

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री चार वर्षांची मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत घरासमोर खेळत होती. दोन्ही मुली या चार वर्षांच्या आहेत.  रात्री आठच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दोघींना गाठले. घरी सोडून देतो, असे सांगत तो दोघींना घेऊन निघाला. त्याने दोघींना एका कंपनीच्या मागे नेले. हा परिसर निर्जन होता. यानंतर नराधमाने त्या मुलींसोबत अश्लील चाळे केले. घाबरुन दोन्ही मुली रडू लागल्या. यानंतर त्याने मुलींना चाकूचा धाक दाखवत त्यांच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 4:55 pm

Web Title: 4 year old girl raped by unknown person in lakadganj
Next Stories
1 सभा तहकूब करून ‘झिंग झिंग झिंगाट’वर नृत्य!
2 हवाई दलाच्या योजनाबद्ध वापराने पाकला धडा शिकवणे योग्यच
3 बेझनबागमधील अतिक्रमण बेकायदाच ; उच्च न्यायालयाने २२ याचिका  फेटाळल्या
Just Now!
X