22 January 2021

News Flash

भारतात सर्पदंशाने दरवर्षी ४० ते ७० हजार मृत्यू

सर्वाधिक घटना महाराष्ट्रात

संग्रहित छायाचित्र

जागतिक आरोग्य संघटनेचा अभ्यास; सर्वाधिक घटना महाराष्ट्रात

दरवर्षी सर्पदंशामुळे भारतात ४० हजार ते ७० हजार लोक मृत्युमुखी पडत असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. सर्पदंशामुळे भारतात होणाऱ्या मृत्यूच्या संदर्भातील नवीन अभ्यास समोर आला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना देखील महाराष्ट्रात आहेत. या सर्पदंशावर प्रतिविष हाच एकमेव पर्याय असल्याने सर्पतस्करीचे प्रमाण वाढले आहे.

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात सुमारे १२ लाख लोक सर्पदंशाने मृत पावले आहेत.  सर्पदंश होऊनही ज्या व्यक्ती जीवित राहिल्या, त्यातील सुमारे १२ ते २१ लाख लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व किंवा शारीरिक व्याधी घेऊन जगावे लागते. सर्पदंशातून जीव वाचवायचा असेल तर प्रतिविष हा त्यावर एकमेव उपाय आहे आणि हे प्रतिविष सापाच्या विषापासूनच तयार के ले जाते. त्यामुळे ही औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये सापाच्या विषाची मागणी वाढत आहे. याचा फायदा घेण्यासाठी  सर्पतस्कर या व्यवसायात उतरले असून त्यामुळे सापांचा व्यापार वाढत आहे. या सर्पतस्करीत देखील महाराष्ट्र अग्रक्र मावर आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियमात सापांना पकडणे आणि मारणे याला बंदी आहे. तरीही अनेक राज्यांमध्ये आणि विशेषकरून महाराष्ट्रात सापांना बेकायदेशीररित्या पकडणे, विष काढणे, प्रतिविष तयार करणाऱ्या औषध कं पन्यांना ते अधिकाधिक दरात विकण्याचा प्रकार सुरू आहे. पाच ते सात वर्षांपूर्वी राज्याच्या उपराजधानीत सर्पविषाच्या तस्करीवर वनखात्याच्यावतीने मोठी कारवाई करण्यात आली होती. या तस्करांकडून लाखो रुपयांचे विष आणि साप जप्त करण्यात आले होते. तसेच त्यांना नागपुरातच अटक करण्यात आली होती. सापांच्या विषाची मागणी वाढत असली तरी पुरवठय़ात अजूनही तीव्र कमतरता आहे. त्यामुळेच अनेकजण या व्यापारात उतरत आहेत. यात त्यांना मोठा नफा मिळतो. या व्यवसायातील मोठे सर्पतस्कर साप पकडणाऱ्याला दोन ते तीन हजार रुपये देऊन त्याची बोळवण करतात आणि स्वत: मात्र त्यावर लाखो रुपये कमावतात.

भारतात दरवर्षी चार लाखाहून अधिक साप अवैधरित्या पकडले जात असल्याचा अहवाल भारतीय वन्यजीव संस्थेनेच दिला होता. इतर राज्यातून होणाऱ्या सर्पतस्करीचा व्यापार देखील महाराष्ट्रातच होतो. अनेक छोटय़ा घरांमध्ये ते सुरक्षित ठेवले जातात, नंतर त्यांची विक्री होते.

सर्पविषाचे दर प्रतिग्रॅम ४० हजारांहून अधिक

भारतीय कोब्राचे एक ग्रॅम विष ४० हजार रुपयाला, रसेल व्हायपरचे एक ग्रॅम विष ५० ते ६० हजार रुपयाला विकले जाते. किंग कोब्रा या प्रजातीच्या सापाच्या विषाची किं मत मात्र अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:11 am

Web Title: 40000 to 70000 snake bite deaths in india every year abn 97
Next Stories
1 राज्यातील रात्रशाळांना पूर्णवेळेचा दर्जा कधी?
2 उपचार करणाऱ्यांपेक्षा बंदोबस्त करणाऱ्यांना करोनाचा अधिक धोका
3 राज्य सरकार, ‘एमपीएससी’ला नोटीस
Just Now!
X