News Flash

एका दिवसात ४६४ नवीन करोनाग्रस्त रुग्णालयांत

२४ तासांत ४० मृत्यू; नवीन ३,७१७ रुग्ण

संग्रहीत

२४ तासांत ४० मृत्यू; नवीन ३,७१७ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ४० करोनाबाधितांचा मृत्यू तर ३ हजार ७१७ नवीन रुग्णांची भर पडली. याशिवाय दिवसभरात प्रकृती खालावल्याने जिल्ह्य़ातील विविध रुग्णालयांत तब्बल ४६४ नवीन करोनाग्रस्त भरती झाले. त्यामुळे बुधवारी जिल्ह्य़ातील रुग्णालयांत भरती रुग्णांची संख्या ४ हजार ३२० या उच्चांकावर पोहोचली आहे.

शहरात बुधवारी २५ हजार ७८५, ग्रामीण ७ हजार ७८७ असे एकूण ३३ हजार ५७२  उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यातील २५ हजार ५३५ रुग्णांवर गृहविलगीकरणात तर गंभीर संवर्गातील ४ हजार ३२० रुग्णांवर विविध रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. दिवसभरात शहरात २६, ग्रामीण ११, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ४० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ३२, ग्रामीण ८७६, जिल्ह्य़ाबाहेरील ८२९ अशी एकूण ४ हजार ७३७ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात २ हजार ९३२, ग्रामीण ७८२, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ३ हजार ७१७ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ६१ हजार ६५२, ग्रामीण ४० हजार ८२५, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ११ अशी एकूण २ लाख ३ हजार ४८८ रुग्णांवर पोहोचली आहे.

सतरा हजारांवर चाचण्या

शहरात दिवसभरात ११ हजार ९५४, ग्रामीण ५ हजार २०१ अशा एकूण १७ हजार  चाचण्या झाल्या. त्याचा अहवाल गुरुवारी अपेक्षित आहे. जिल्ह्य़ात मंगळवारी झालेल्या १४ हजार ९५६ चाचण्यांत  ३ हजार ७१७ व्यक्तींना करोना असल्याचे निदान झाल्याने सकारात्मक अहवालाचे प्रमाण २४.८५ टक्के नोंदवले गेले.

करोनामुक्तांचे प्रमाण आणखी घसरले

शहरात दिवसभरात १ हजार ७८३, ग्रामीण ३१५ असे एकूण २ हजार ९८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ३३ हजार ५७७, ग्रामीण ३१ हजार ६०२ अशी एकूण १ लाख ६५ हजार १७९ व्यक्तींवर पोहोचली. हे प्रमाण ८१.१७ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:29 am

Web Title: 464 new covid 19 patients hospitalized in nagpur zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लोकजागर  : संत्र्यांवर ‘घोषणारोग’!
2 आजीसमोर नातीवर बलात्कार
3 व्हॉट्सअ‍ॅप, गुगलवरून परीक्षेची उत्तरे लिहिणाऱ्याला पकडले
Just Now!
X