२४ तासांत ७ मृत्यू; ३३५ नवीन बाधित

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ७ करोना बाधितांचा मृत्यू झाला तर ३३५ नवीन रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, ऑक्टोबरनंतर जिल्ह्य़ात प्रथमच २४ तासांत ५७६ रुग्ण करोनामुक्त झाले.

दैनिक करोनामुक्तांमध्ये शहरातील ५२२, ग्रामीणचे ५४ असे एकूण ५७६ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ९१ हजार ७०९, ग्रामीण २३ हजार २१७ अशी एकूण १ लाख १४ हजार ९२६ वर पोहोचली आहे.  शहरात दिवसभरात १, ग्रामीणला ३, जिल्हय़ाबाहेरील ३ असे एकूण ७ बाधितांचा मृत्यू झाला. आजपर्यंतच्या शहरातील दगावलेल्यांची संख्या २ हजार ६२७, ग्रामीण ६८६, जिल्हय़ाबाहेरील ५९४ अशी एकूण ३ हजार ९०७ रुग्णांवर पोहचली आहे.  २४ तासांत शहरात ३०४, ग्रामीणला २८, जिल्हय़ाबाहेरील ३ असे एकूण ३३५ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील बाधितांची संख्या ९७ हजार ११६, ग्रामीण २४ हजार ७५७, जिल्हय़ाबाहेरील ७७६ अशी एकूण १ लाख २२ हजार ६४९ रुग्णांवर पोहचली आहे.

सक्रिय बाधितांची संख्या चार हजारांखाली

जिल्ह्य़ात मध्यंतरी  सक्रिय  रुग्णांची संख्या पाच हजाराहून अधिक झाली होती. परंतु आता हळूहळू रुग्ण कमी होत असल्याने ही संख्या ३ हजार ८१६ रुग्णांवर आली आहे. त्यात शहरातील २ हजार ७८०, ग्रामीणच्या १ हजार ३६ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांतील २ हजार ८६० रुग्ण गृह विलगीकरणात, ९५६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

विदर्भातील मृत्यू

(२८ डिसेंबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                   ०७

वर्धा                         ००

चंद्रपूर                    ०२

गडचिरोली              ००

यवतमाळ               ००

अमरावती              ००

अकोला                  ०२

बुलढाणा                 ०१

वाशीम                    ००

गोंदिया                   ००

भंडारा                     ०१

एकूण                     १३