News Flash

मृत्यूची पंचाहत्तरी!

सहा हजारांवर नवीन रुग्ण; ५ हजार ८९४ रुग्ण करोनामुक्त

सहा हजारांवर नवीन रुग्ण; ५ हजार ८९४ रुग्ण करोनामुक्त

नागपूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात  करोनाच्या मृत्यूसंख्येने उच्चांक गाठला. दिवसभरात तब्बल ७५ रुग्णांचा बळी गेला तर ६ हजार १०९ नवे रुग्ण आढळले. करोनामुक्त रुग्णांचीही संख्या वाढली असून शुक्रवारी ५ हजार ८९४ रुग्ण पहिल्यांदाच बरे होऊ घरी परतले.

दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या  धडकी भरवत आहे. आरोग्य प्रशासन हादरले असून रुग्णालयात खाटे अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यत ७५ मृत्यूची नोंद झाली. यामध्ये ३७ शहरातील, ३३ ग्रामीणचे तर ७ जिल्ह्यबाहेरील आहेत.  एकूण मृत्यूची संख्या ६ हजार १०९ वर पोहोचली आहे. दिवसभरात ६ हजार १९४ रुग्ण आढळले असून यामध्ये ३ हजार ७७९ शहरातील,२ हजार ४०८ ग्रामीणचे तर ७ जिल्ह्यबाहेरील आहेत. आजवर बाधितांची संख्या तीन लाख ९० हजार ४३ वर पोहोचली आहे. दिवसभरात २५ हजार ५७३ करोना चाचण्या झाल्या असून यामध्ये १४ हजार ९५ शहरातील तर ११ हजार ४७८ चाचण्या ग्रामीणमध्ये झाल्या. दिवसभरात ५ हजार ८९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यत करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.६० टक्के आहे.

शहरातील लसीकरणाची स्थिती

पहिली मात्रा

आरोग्य सेवक        – ४१२९३

फ्रंट लाईन वर्कर    –  ३६५६३

४५ + वयोगट        –    ७२७००

४५ + कोमार्बिड    –      ६७४१३

६० + सर्व नागरिक  – १,४६,५४४

पहिली मात्रा – एकूण : – ३,६४,५१३

दुसरी मात्रा

आरोग्य सेवक        – १६०८७

फ्रंट लाईन वर्कर     –  ८९२४

४५ + वयोगट        –   १०४६

४५ + कोमार्बिड    –    २०५८

६० + सर्व नागरिक   – ६८७५

दुसरी मात्रा – एकूण – ३५०१७

एकूण  लसीकरण  – ३,९९,५३०

सक्रिय रुग्ण ६४ हजारांवर

विविध रुग्णालय व गृहविलगीकरणातील मिळून ६४ हजार ३३५ सक्रिय बाधित आहेत. यामध्ये ३९ हजार ५१७ शहरात तर २४ हजार ८१८ ग्रामीणचे आहेत.

झोननिहाय (२४ तासांत) करोना रुग्ण व मृत्यू

झोन                          रुग्ण          मृत्यू     

लक्ष्मीनगर                 ६२८           ३

धरमपेठ                    ३७५           ३

हनुमानगर                  ६४७          ५

धंतोली                        ३५५           ६

नेहनरूनगर                  ५७१           ६

गांधीबाग                      १८६           २

सतरंजीपुरा                  १०१          ३

लकडगंज                      २८८           १

आशीनगर                   २९३          ६

मंगळवारी                    ३३५          २

एकूण                        ३७७९           ३७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 2:00 am

Web Title: 6 thousand 194 new patients tested covid 19 positive in nagpur zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कॅब चालकाकडून गतिमंद मुलीवर बलात्कार
2 नागपुरात आता फिरत्या करोना चाचणी प्रयोगशाळा
3 खासगी शववाहिके साठीही लूट
Just Now!
X