News Flash

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

डिसेंबर महिन्यात वृद्धाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

नागपूर : १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ६० वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची घटना शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत बुधवारी उघडकीस आली. शैलेंद्र हिरामण गजभिये असे आरोपीचे नाव आहे. आरोपी टायर विक्रीचा व्यवसाय करतो. ऑक्टोबर २०१८ मध्ये घरासमोर खेळत असलेल्या पीडितेला मॅगी खाऊ  घालण्याचे आमिष दाखवून घरी बोलावले.तिच्याशी अश्लील चाळे केले. तिने प्रतिकार केला असता आई आणि बहिणीचा खून करण्याची धमकी दिली.  डिसेंबर महिन्यात वृद्धाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिला नेहमी घरी बोलावून बलात्कार करायचा. मंगळवारी पत्नी घरी नव्हती.  त्याने पीडितेला घरी बोलावले. परिसरातील महिलांना त्याच्यावर शंका आली. महिलांनी तिच्या आईला माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 1:01 am

Web Title: 60 years old rape minor girl in nagpur
Next Stories
1 पाच वर्षांनी पिता-पुत्राची गळाभेट!
2 पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल
3 देशात काँग्रेस आघाडीचे सरकार येणार
Just Now!
X