News Flash

विदर्भात एका दिवसात करोनाचे ७४ बळी

सर्वाधिक ६३ टक्के मृत्यू नागपूरमध्ये

विदर्भातील अकरा जिल्ह््यात २४ तासांमध्ये करोनामुळे तब्बल ७४ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंपैकी ६३.५१ टक्के मृत्यू हे केवळ नागपूर जिल्ह््यातील आहे.  विदर्भात गुरूवारी २४ तासांत ६ हजार ७६२ नवीन  रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

नागपूर जिल्ह््यात दिवसभऱ्यात करोना आजारामुळे ४७ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. त्यात शहरातील ३३, ग्रामीण १०, जिल्ह््याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभऱ्यात जिल्ह््यात ३ हजार ५७९ नवीन रुग्ण आढळले. अमरावती जिल्ह््यात २४ तासांत ६ मृत्यू तर ३४२ नवीन रुग्ण आढळले. यवतमाळ जिल्ह््यात ५ रुग्णांचा मृत्यू तर ४३९ नवीन रुग्ण आढळले. चंद्रपूर जिल्ह््यात २ मृत्यू तर २४५ नवीन रुग्ण आढळले. गडचिरोली जिल्ह््यात मृत्यू नसला तरी ५६ रुग्ण आढळले. वर्धा जिल्ह््यात ४ मृत्यू तर २५१ नवीन रुग्ण आढळले. भंडाऱ्यात मृत्यू नसला तरी २४४ रुग्ण आढळळे. गोंदियात मृत्यू नसला तरी ८८ रुग्ण आढळले.

नागपूर जिल्ह््यात २२ मार्चला ४० रुग्णांचा मृत्यू तर २४ मार्चलाही ४० रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला होता. परंतु २५ मार्चला मृत्यूंची संख्या ४७ नोंदवण्यात आल्याने हा नववर्षातील करोना बळींचा उच्चांक ठरला आहे. वाशिमला ४ मृत्यू झाले व ३०६ रुग्ण आढळले. अकोल्यात १ मृत्यू झाला, ४३९ नवीन रुग्ण आढळले. बुलढाणा जिल्ह््यात ५ मृत्यू झाले असून ७७३ रुग्णांची नोंद झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 12:20 am

Web Title: 74 victims of corona in one day in vidarbha abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ना ट्रेसिंग, ना औषधोपचार!
2 खासगी रुग्णालयात दाखल्यासाठी करोनाग्रस्तांची फरफट!
3 एका दिवसात ४६४ नवीन करोनाग्रस्त रुग्णालयांत
Just Now!
X