२४ तासांत २० मृत्यू; ७४६ नवीन बाधितांची भर
नागपूर : जिल्ह्य़ात पूर्वीच्या तुलनेत नवीन करोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. परंतु २४ तासात आढळलेल्या नवीन ७४६ बाधितांमुळे येथील आजपर्यंत आढळलेल्या बाधितांची संख्या ८५ हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. शिवाय दिवसभरात जिल्ह्य़ात २० मृत्यू नोंदवले गेले.
नवीन रुग्णांमध्ये शहरातील ५६३, ग्रामीणचे १७५, जिल्ह्य़ाबाहेरील ८ अशा एकूण ७४६ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील बाधितांची संख्या ६६ हजार ८७२, ग्रामीण १७ हजार ४९५, जिल्ह्य़ाबाहेरील ४६० अशी एकूण ८४ हजार ८२७ वर पोहचली आहे. आज गुरुवाही पुन्हा नवीन बाधितांहून करोनामुक्तांची संख्या अधिक होती. जिल्ह्य़ातील २४ तासांतील २० मृत्यूंमध्ये शहरातील ८, ग्रामीणचे ४, जिल्ह्य़ाबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण मृत्यू संख्या १ हजार ९७१, ग्रामीण ४७५, जिल्ह्य़ाबाहेरील २७८ अशी एकूण २ हजार ७२४ वर पोहचली आहे.
दिवसभरात १,०१२ करोनामुक्त
शहरात दिवसभरात ७४५, ग्रामीण २६७ असे एकूण १ हजार १२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या ५८ हजार १८४, ग्रामीण १४ हजार ४३० अशी एकूण ७२ हजार ६१४ वर पोहचली आहे. करोनामुक्तांचे प्रमाण ८५.६० टक्के आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या साडेनऊ हजारांवर
शहरी भागात ६ हजार ४४६ तर ग्रामीणला ३ हजार ४३ असे एकूण ९ हजार ४८९ सक्रिय रुग्ण गुरुवारी नोंदवले गेले. यापैकी २ हजार ६६९ जण विविध रुग्णालयांत तर सुमारे ६ हजार ८३ जण गृहविलगीकरणार उपचार घेत आहेत.
२४ तासातील ७७ टक्के चाचण्या शहरात
शहरात २४ तासांत ४ हजार ७७९, ग्रामीणला १ हजार ३८९ असे एकूण ६ हजार १६५ आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. त्यानुसार शहरी भागात एकूण चाचण्यांतील ७७.५१ टक्के चाचण्यांचा समावेश होता.
विदर्भातील (०८ऑक्टोबर) मृत्यू
जिल्हा मृत्यू
नागपूर २०
वर्धा ०५
चंद्रपूर ०१
गडचिरोली ००
यवतमाळ ००
अमरावती ०५
अकोला ०१
बुलढाणा ०२
वाशीम ०१
गोंदिया ००
भंडारा ०३
एकूण ३८
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 9, 2020 12:11 am