नागपूर : उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते  होईल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी  शुक्रवारी दिली. उस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून त्यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या सहवासामुळे साहित्य क्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी इतर भाषांतील प्रतिभावंत लेखकांना  निमंत्रित करण्याची मागच्या काही वर्षांतील परंपरा नाकारून यंदा मराठी लेखकाच्याच हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल व हा मान  ना.धों. महानोर यांना मिळेल, असे वृत्त लोकसत्ताने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११, १२ जानेवारी २०२०  रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. या संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
marathi sahitya sammelan, Delhi,
यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?