25 November 2020

News Flash

नागपूर पोलिसांसाठी ९५० कोटींचा निधी

हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे भूमिपूजन

भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

  • हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे भूमिपूजन
  • विस्थापित कुटुंबांना आवास योजनेतून घरे

पोलिसांचे मनोधैर्य उंचावणे आणि पायाभूत सुविधांसाठी नागपूर पोलिसांना ९५० कोटी रुपयांचा निधी उपलब्?ध करून दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या भूमिपूजनाप्रसंगी दिली.

यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजी बोडखे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कायदा व सुवस्था राखण्यासाठी लोकसंख्येनुसार पोलीस ठाण्याची रचना करण्यात येत असून तेथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. शासनाच्या प्रयत्नांनी लकडगंज स्मार्ट पोलीस ठाणे हे एक आदर्श पोलीस ठाणे तयार झाले असून याठिकाणी पोलीस वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. राज्यातील पोलिसांना मानवी चेहरा देण्यात येत असून ही यंत्रणा एक सेवा देणारी यंत्रणा म्हणून विकसित करण्यात येत आहे. निर्भय वातावरणात तक्रारी समोर याव्यात, यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. त्यासोबतच तक्रार नोंदवण्यासाठी ई-प्लॅटफार्म तयार करण्यात आला आहे. यातून ऑनलाईन तक्रारी करता येणे शक्य झाले आहे. या तक्रारी ऑनलाईन उपलब्ध असल्याने त्यांचा मागोवा घेणे सहज शक्य झाले आहे.

सीसीटीएनएसच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण पोलीस ठाणी माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्यात आली आहेत. यामुळे गुन्हेगारांची माहिती ऑनलाईन उपलब्ध होत आहे. केवळ दहा सेकंदामध्ये गुन्हेगारांविषयी माहिती गोळा करणे शक्य झाले आहे. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रामुख्याने वाहतूक नियंत्रण करणे शक्य झाले आहे. येत्या काळात केवळ एकाच ठिकाणाहून वाहतुकीचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना घरपोच ई-चलान पाठवण्यात येत आहे. येत्या काळात गर्दी लक्षात घेता वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या जागेवरून १८ कुटुंबांना विस्थापित करावे लागले. या सर्व कुंटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपूरच्या विकासासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. मेट्रो, उड्डाणपूल, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. नागरिकांना पाण्याची सुविधा मिळावी, यासाठी प्रय करण्यात आले असून मुबलक पाणी मिळत आहे. शहरातील सुविधांमध्ये वाढ करीत असताना अपघातमुक्त शहर होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, लोकसंख्येनुसार पोलीस ठाणे तयार होत असल्यामुळे शहरात तीन नवीन पोलीस ठाणे निर्माण झाली आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा देण्यात येतील. शहरातील सर्वच पोलीस ठाणे स्मार्ट होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे यांनीही मार्गदर्शन केले. उपायुक्त नीलेश भरणे यांनी प्रास्ताविक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 3:08 am

Web Title: 950 crore rs funds for nagpur police
Next Stories
1 कारमध्ये ३.१८ कोटींची रोकड सापडली
2 गोंदियात काळविटांच्या संख्येत पाचपटीने वाढ!
3 चुकीचे वक्तव्य करून न्यायपालिकेचा अवमान टाळावा
Just Now!
X