News Flash

धक्कादायक! पत्नी नांदत नसल्याने मेहुणीच्या एक महिन्याच्या बाळाची धारदार शस्त्राने हत्या

पोलिसांनी आरोपी गणेश बोरकरला अटक केली आहे

नागपुरात पती-पत्नीच्या भांडणात एक महिन्याच्या बाळाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग आरोपीने मेहुणीच्या बाळावर काढत हत्या केली आहे. पत्नी नांदत नसल्याने आरोपी गणेश बोरकरच्या डोक्यात संताप होता. याच संतापात त्याने मेहुणीच्या एक महिन्याच्या बाळाची हत्या केली. पोलिसांनी आरोपी गणेश बोरकरला अटक केली आहे.

नागपूरमधील पारशिवणी पोलीस स्टेशन अंतर्गत बाखरी (पिपळा) गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गणेश बोरकर आणि त्याच्या पत्नीत वारंवार भांडणं होत होती. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. यामुळे गणेश बोरकर पत्नीच्या माहेरी पोहोचला होता. यावेळी त्याचा सासरच्या लोकांसोबत वादही झाला.

यावेळी त्याची मेहुणी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. गणेश बोरकरच्या शेजारीच बाळ झोपलं होतं. त्याने संतापाच्या भरात धारदार शस्त्र काढलं आणि पाळण्यात झोपलेल्या बाळाची निर्घृण हत्या केली. बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी गणेश बोरकरला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 4:11 pm

Web Title: a man killed one month child over fight with wife in nagpur sgy 87
Next Stories
1 विद्वानांमधील निस्पृहता लोप पावतेय
2 राजभवन, सेमिनरी हिल्सवरील अनधिकृत धार्मिक स्थळ पाडले
3 खंडणी मागणाऱ्या तोतया पोलिसांना चोप
Just Now!
X