News Flash

नागपूर हादरलं; कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत सासू आणि मेहुणीचीही हत्या; नंतर गळफास घेत केली आत्महत्या; परिसरात एकच खळबळ

घरातील पाच जणांची हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली (Express Photo: Dhananjay Khedkar)

नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. नागपुरच्या पाचपावली भागात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. दरम्यान घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घऱी आला आणि गळफास घेत आत्महत्या करुन जीवन संपवलं.

रविवारी रात्री या हा सगळा प्रकार घडल्याचं समजत आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 2:12 pm

Web Title: a man murders family before committing suicide in nagpur sgy 87
Next Stories
1 नागपुरातील विविध रुग्णालयांत करोनाहून ‘म्युकर’चे दुप्पट रुग्ण
2 उच्चभ्रू वस्तीतील झोपडपट्टीधारक जमीन मालक झाले
3 एलेक्सिस रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून रुग्णाचा विनयभंग!
Just Now!
X