भारतातील भूजल आणि भूतलावरील पाणी अतिशय दूषित असून के वळ ३२ टक्के भारतीय घरांमध्ये प्रक्रि या के लेले शुद्ध पाणी मिळते. दरवर्षी या दूषित पाण्याशी निगडित आजारांमुळे सुमारे तीन लाख मुले मृत्युमुखी पडतात. अतिसारासारख्या आजारामुळे ५० टक्के लोकांचा मृत्यू होतो. बंगळुरू व नोएडा येथील ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी’ यांनी के लेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

भारतातील प्रत्येक घरात प्रक्रि या के लेले शुद्ध पाणी पुरवण्यासाठी शासन दरवर्षी विविध योजना आणते. तरीही देशभरातील घरांमध्ये प्रक्रि या के लेले शुद्ध पाणी पुरवणे ही जटील प्रक्रि या आहे. पाण्याचे दूषित स्त्रोत नाहीसे करून ते पाणी शुद्ध करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता आहे. या अभ्यासात पाणीपुरवठा प्रक्रि येची कार्यक्षमता आणि टिकाव वाढवण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या काही पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. पाणी स्वच्छ करण्यासाठी आणि त्या प्रक्रि येसाठी किती ऊर्जा आवश्यक आहे, याचा अंदाज यात मांडण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक भार कमी होण्यास आणि पर्यावरणाचे नुकसान रोखण्यास मदत होते. भारतातील सुमारे ६४० जिल्ह्य़ांमधून हा अभ्यास करण्यात आला आहे. विशेषत: भूगर्भातील पाणी हे मुख्य स्त्रोत असलेल्या भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी समुदायस्तरावरील उपाययोजना राबवण्याचा प्रस्ताव देखील या अभ्यासात मांडण्यात आला आहे. यात प्रामुख्याने सामुदायिक जलशुद्धीकरण प्रणालीचा समावेश आहे. घरगुती कारणासाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना शुद्धीकरणासाठी आवश्यक ऊर्जेचे प्रमाण यामुळे कमी होईल. अक्षय ऊर्जेचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जाऊ शकतो. या ऊर्जा स्त्रोताचा वापर करुन पाण्याचे शुद्धीकरण करून सर्व घरांना ते पुरवल्यास दरवर्षी १० हजार ९०० ते ११ हजार ७०० कोटी रुपये खर्च येईल. औष्णिक ऊर्जा वापरून के लेल्या पाणी शुद्धीकरणाच्या तुलनेत हा खर्च ४० ते ६० टक्क्यांनी कमी होईल. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होईल, असेही निरीक्षण या अभ्यासात मांडण्यात आले आहे.

*  देशभरातील पाण्याचे स्त्रोत आजार पसरवणाऱ्या जंतूंच्या अधिक प्रमाणामुळे दूषित झाले आहेत.

* भारतातील २४ राज्यांमधील बहुतेक जिल्ह्य़ांमध्ये भूजलात जड धातू आणि इतर धातूंचे प्रमाण अधिक आहे.

* या पाण्यामुळे टायफाईड, कॉलरा, अतिसार, कर्करोग, हाडांशी संबंधित आजार होतात. दरवर्षी सुमारे ३७.७ दशलक्ष लोकांना या आजाराचा त्रास होतो आणि दरवर्षी सुमारे ७३ दशलक्ष कामकाजाचे दिवस वाया जातात.

* या आजारामुळे कामावर परिणाम होतो. त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पादकतेवर होतो. परिणामी, मोठय़ा प्रमाणावर आर्थिक भार पडतो.