02 March 2021

News Flash

खामला चौकात भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक, एक महिला गंभीर

अपघातानंतर ट्रेलरचालक ट्रेलर सोडून पळून गेला. ही घटना आज बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

खामला चौकात अनियंत्रित झालेल्या ट्रेलर रस्ता दुभाजक आणि दुचाकीला धडक देऊन विजेच्या खांबाला जाऊन धडकला.

 

अनियंत्रित झालेल्या एका ट्रेलरने खामला चौकातील सिग्नल तोडून दुचाकीला धडक दिली. यात दोघेजण गंभीर जखमी असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर ट्रेलरचालक ट्रेलर सोडून पळून गेला. ही घटना आज बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

माधुरी रवींद्र नासरे (४२) आणि नितेश रवींद्र नासरे (२१) दोन्ही रा. भेंडे लेआऊट, स्वावलंबीनगर अशी जखमींची नावे आहेत. यापैकी माधुरी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खामला चौकातीलच ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश टेकडी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळी ६.३० वाजता माधुरी या आपला मुलगा नितेश याच्यासह एमएच-३१, पीटी-४७१४ क्रमांकाच्या दुचाकीने घरातून निघाल्या. सातच्या सुमारास त्या जुनी सिंधी कॉलनी परिसरातून अजनीकडे येत असताना प्रतानगर चौकातून छत्रपती चौकाकडे जाणारा भरधाव सीजी-०४, जेए-२९०९ क्रमांकाच्या ट्रेलरने डाव्या बाजूच्या रस्ता दुभाजकाला धडक मारून दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर ट्रेलर रस्त्यावरील विजेच्या खांबला धडकले. या धडकेमुळे नितेश आणि माधुरी या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर नितेशच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. नितेशवर प्राथमिक उपचार करून त्याची सुटका करण्यात आली. मात्र, माधुरी यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. अपघातानंतर परिसरातील वाहतूक खोळंबली होती. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून पळून गेला. माहिती मिळताच धंतोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 3:32 am

Web Title: accident in nagpur
Next Stories
1 लोकजागर :  यादवांचा ‘बुद्धय़ांक’!
2 छत्रीतलाव परिसरातील प्रस्तावित अवैध चराई करणाऱ्यांना उद्यानाचा त्रास
3 ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश
Just Now!
X