News Flash

तिवारी हत्याकांडातील आरोपीला ‘ट्रांझिट रिमांड’

मायनॉरिटी डेमोक्रेटिक फंट्रचा नेता?

उत्तर प्रदेशातील बहुचर्चित कमलेश तिवारी हत्याकांडातील आरोपी सय्यद असीम अली (२९) रा. माने लेआऊट, झिंगाबाई टाकळी याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले. त्याला उत्तर प्रदेशला घेऊन जाण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सय्यद अलीला ट्रांझिट रिमांड मंजूर केला.

लखनौ येथील राजकीय पुढारी कमलेश तिवारी याने प्रक्षोभक वक्तव्य केल्याने त्याचा खून झाला. या प्रकरणी १८ ऑक्टोबर २०१९ ला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरू आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेश एटीएसने अशफाक हुसेन जाकील हुसेन शेख (३४), मोहिनुद्दीन खुर्शिद पठाण (२७), मौलाना मोहसीन शेख सलीम, फैजान युनूस (२१) आणि रशीद अहमद खुर्शिद अहमद (२३) सर्व रा. सूरत यांना अटक केली. त्यावेळी नागपुरातील सैय्यद हा आरोपींच्या संपर्कात होता, अशी माहिती तपासात समोर आली.

उत्तर प्रदेशच्या एटीएसने महाराष्ट्र एटीएसला माहिती दिली. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अविनाश बारगळ, उएपायुक्त विक्रम देशमाने, सहाय्यक आयुक्त गणेश किंद्र आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल लोखंडे यांनी आरोपी सय्यदला ताब्यात घेतले. त्याला खून व खुनाचा कट रचण्याचा गुन्ह्य़ात अटक करण्यात आला. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी आज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी झाली असता न्यायालयाने एटीएसला आरोपीचा ट्रांझिट रिमांड मंजूर केला. यानंतर उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी त्याला लखनौला घेऊन गेले.

मायनॉरिटी डेमोक्रेटिक फंट्रचा नेता?

सय्यद अली याचा हार्डवेअरचा व्यवसाय असून कट्टरवादी आहे. तो वहाबी आणि देवबंधी यांच्या विरोधात काम करतो. त्यामुळे त्याने कमलेश तिवारीच्या कृत्याचा विरोध केला असून त्यासंदर्भात यु टय़ूबवर व्हीडिओही उपलब्ध आहे. तो सुन्नी युथ विंगचा संस्थापक असून मायनॉरिटी डेमोक्रेटिक फ्रंटचा नेताही असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 9:46 am

Web Title: accused of kamlesh tiwari murder sent into transit remand bmh 90
Next Stories
1 मतदारांचा निरुत्साह, टक्केवारी घसरली
2 ईव्हीएम बिघाडाने  मतदार त्रस्त
3 विक्की कुकरेजांच्या कार्यालयावर छापा
Just Now!
X