News Flash

…तर डॉक्टरांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई!

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत

प्रतिनिधिक छायाचित्र

सरकारी करोना रुग्णालयात सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांवर पोलिसांची मदत घेऊन  कारवाई करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. सेवेत रूजू न होणाऱ्या काही डॉक्टर्सची नावेही पोलिसांकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याला दुजोरा दिला आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये खाटा वाढवण्यात येत आहेत. तेथे डॉक्टर्सची आवश्यकता आहे. त्यासाठी  पालकमंत्री नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने आयुर्वेदिक, दंत महाविद्याालय, ईएसआयएससह केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेतील  सुमारे २०० डॉक्टरांची सेवा  महामारी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अधिग्रहित करून त्यांना मेडिकल, मेयो, महापालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्यास सांगितले. काही डॉक्टर्स रुजूही झाले. पण, अजूनही काही डॉक्टर्स सेवेवर आले नाहीत. काही डॉक्टर्स एक दिवस काम करतात व नंतर पुन्हा येत नाही, असेही  आढळून आले आहे.  मेडिकल व्यवस्थापनाकडूनही वारंवार मनुष्यबळाचा मुद्दा पुढे के ला जात होता.

यादरम्यान पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली. त्यांनी जे डॉक्टर रूजू झाले नाहीत त्यांच्यावर कारवाई करा, असे स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या डॉक्टरांची माहिती पोलीस खात्याला कळवली असल्याची माहिती आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठकरे यांच्याशी संपर्क   साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.  काही लोक रुजू होत आहेत, पण काहींनी अद्यापही हटवादी भूमिका सोडली नाही, त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार असे ठाकरे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त यादीतील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना एकदा  संपर्क साधून त्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. तसेच आदेश प्रशासनाकडून होते. संबंधित व्यक्ती शासनाच्या सेवेत रुजू न झाल्यास त्यांच्याविरुद्ध  कारवाईचे कोणतेही आदेश नाहीत.

– बसवराज तेली, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 12:59 am

Web Title: action on doctors with the help of police district collector of nagpur abn 97
Next Stories
1 गृह विलगीकरणातील गंभीर करोनाग्रस्तांना रेमडेसिविर मिळणार कसे?
2 ‘बीएनएचएस’च्या संशोधकांकडून नव्या पक्षाची नोंद
3 स्वाधार योजनेत पाच वर्षांत निम्माच खर्च
Just Now!
X